Son slapped his mother viral video: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हटलं जातं, कारण आईची पोकळी आयुष्यात कोणीच भरून काढू शकत नाही. आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करते, माया करते; त्यांना ती स्वत:पेक्षा जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी दिवस-रात्र झटणारी आई खूप कमी मुलांना कळते. आईने केलेले कष्ट ज्या लेकराला कळतात तोच आईचा आदर करतो, मोठं होऊन तिचा आधार बनतो. पण, ज्यांना कधी आपली आईचं कळली नसते ती मुलं मोठं होऊन आईला त्रास देतात.

ज्यांना आईचं प्रेम कधी कळत नाही, ती मुलं आईशी वाईट वागतात. आईला नको नको ते बोलतात, तिला वाईट वागणूक देतात. एवढंच नाही तर ज्या आईने नऊ महिने त्रास सहन करून आपल्याला जन्म दिला आहे, तिच्यावर हात उगारायलाही अशी मुलं मागे पुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका मुलाने रस्त्यावरच आपल्या आईला मारहाण केली. नेमकं प्रकरण काय? ते जाणून घेऊ…

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

हेही वाचा… एवढी हिंमत येतेच कुठून? स्वत:च्या बायकोसमोर शेजारी तरुणीसोबत केलं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून बसेल धक्का

मुलाने आईला केली मारहाण

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक आई, तिचा मुलगा आणि एक महिला असे तिघंही रस्त्याच्या कडेला उभे असतात. इच्छित स्थळी जाण्यासाठी ते तिघंही तिथे थांबले असतात. यादरम्यान मुलगा आईशी जोराजोरात भांडू लागतो, तिच्यावर ओरडू लागतो. याच रागात तो अचानक तिच्यावर हात उगारतो. आईच्या जोरात कानाखाली मारल्यामुळे ती तिथल्या तिथे खाली कोसळते. कोसळल्यावर ती तशीच तिथेच पडून राहते. परिस्थिती लक्षात घेता त्यांच्याबरोबर असलेली महिला त्या आईला उचलते.

हा व्हायरल व्हिडीओ @painfull.lines.143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “अशी मुले होण्यापेक्षा मुलं न झालेली बरी” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

हेही वाचा… पैशांचा कसला माज दाखवता! कार चालकाने पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर उडवले पैसे अन्…, संतप्त VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असा मुलगा असण्यापेक्षा नसलेलाच बरा”, तर दुसऱ्याने “अशा मुलाची लाज वाटते, याला पकडून मारलं पाहिजे” अशी कमेंट केली. तर एक जण म्हणाला, “याची तक्रार करून याला अटक झाली पाहिजे.”