Snake Mating Viral video : सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे शिकारीचे, तर कधी लढाईचे, तर काही फारच थक्क करणारे असतात. वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो. साप चावण्याच्या भितीने आपण सावध होत बाजूला जातो. परंतु तुम्ही दोन सापांचं मिलन होताना पाहिलं आहे का? त्यात आता सापांच्या मिलनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात सापांची जोडी मिलनात मग्न असल्याचे दिसतेय. हे दृश्य पाहतानाही तुमच्या अंगावर काटा येईल. सापांची ही जोडी प्रेमात मग्न असल्याचे दिसून येते.

सापांच्या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो. साप चावण्याच्या भितीने आपण सावध होत बाजूला जातो. परंतु तुम्ही दोन सापांचं मिलन होताना पाहिलं आहे का? या व्हायरल व्हिडिओमध्ये सापांची जोडी अचानक बाजूच्या झाडाझुडपातून रस्त्यावर येत असल्याचं दिसत आहे. एकमेकांभोवती वेटोळे घालणारी ही सापाची जोडी बराच काळ रस्त्यावर आहे. साप असे एकमेकांच्या जवळ मिलनाच्या काळातच येतात. सगळ्यांसमोर ते खरंतर असे एकमेकांच्या जवळ येत नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते बघितल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील.

साप पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते. पण जर याचऐवजी सापांची जोडी एकमेकांना आलिंगन देत प्रेमालाप करताना दिसून आली तर मग हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असते. पण असे दृश्य क्वचितच पहायला मिळते. एकमेकांला अलिंगन देत प्रेमात बुडालेले हे दोन साप पाहून पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही साप प्रणयक्रीडा करताना दिसत आहेत. एका जंगल परिसरात या सापांचा रोमान्स सुरू असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमधील हे साप जवळपास आठ फूट लांबीचे असून दोघेही एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात. मात्र यामध्ये संतापजनक बाब म्हणजे बघ्यांनी यावेळी सापाच्या अंगावर कापड टाकण्याचा संतापजनक प्रकार केला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हि़डीओ officialvishu71 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.