Viral Video: उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एका पती-पत्नीमध्ये मोठं भांडण झालं. एका महिलेने रागाच्या भरात हतोड्याने नवऱ्याची कार फोडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. FPJ च्या वृत्तानुसार सांगितलं जातं की पती-पत्नीमध्ये वाद तेव्हा वाढला, जेव्हा पतीने घरखर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला.
व्हायरल व्हिडीओ (Husband Wife Fight Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतील महिलेचं नाव हिमानी आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ती हातात हतोडी घेऊन कारच्या काचांवर मारताना दिसतेय. ही कार दुरुस्तीकरिता स्थानिक गॅरेजमध्ये आणली होती. हिमानीने कारच्या सगळ्या काचा फोडल्या आणि त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला. आजूबाजूचे लोक हे सगळं पाहून शॉक झाले होते
FPJ च्या वृत्तानुसार पती-पत्नीमधील ही घटना नजीबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिजनौर पोलिसांनी या घटनेबाबत अधिकृत निवेदन दिले. नजीबाबाद विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की धर्मेंद्र आणि त्याची दुसरी पत्नी हिमानी यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली. रागाच्या भरात हिमानी त्या गॅरेजमध्ये गेली जिथे तिच्या नवऱ्याने कार दुरुस्तीला दिली होती आणि तिने ती कार फोडली. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अहवालानुसार, त्या महिलेनं हतोड्याने कारच्या सगळ्या काचा फोडून सुमारे ₹४०,००० चे नुकसान केलं. त्या वेळी तिथे असलेल्या मेकॅनिकने तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली.
घटनेच्या चौकशीत वादाचं खरं कारण अजून तपासालं जात आहे. अहवालांनुसार, हिमानीचा नवरा धर्मेंद्र याने घरखर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी कार दुरुस्त करण्यावर पैसे खर्च केले. यामुळे हिमानी रागावली आणि रागाच्या भरात तिने कार फोडली.
दरम्यान, पत्नीचा हा व्हिडीओ @Zuber_Akhtar1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पोलिसांना कॉल करून या महिलेला अटक करा”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अरे हा काय प्रकार आहे राग काढायचा” तर एक जण कमेंट करत म्हणाला, “हीची रितसर कंप्लेंट करा”.
