Indigo Flight Video Viral : गरमीच्या वातावरणात पंखा, एसी आणि कूलरशिवाय राहणं कठीणच असतं. जर काही सेकंदांसाठी पंखा बंद केला, तर असं वाटतं कुणीतरी उचलून आगीवर बसवलं आहे. काही माणसांची तर गरमीमुळे अत्यंत खराब अवस्था होते. मग जरा विचार करा, तुम्हाला भीषण गरमीत जर एक-दीड तास एखाद्या विमानातून प्रवास करावा लागला आणि एसी बंदच पडला, तर काय अवस्था होईल. नक्कीच गरमीमुळे माणसांची अवस्था खराब होते.असाच काहीसा प्रकार नुकताच इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत घडला.

इंडिगोच्या विमानात नेमकं काय घडलं?

Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Mig 29 crashes
Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
pune Twitter user Adam Alanja 646 claimed there was bomb on Vistara flight UK 991
दिल्ली ते पुणे विमानात बॉम्ब असल्याच्या, अफवेने पुणे विमानतळवर पुन्हा खळबळ
Viral video Cars, trucks in air after hitting Gurugram speed bump
स्पीडब्रेकरला धडकून हवेत उडत आहेत गाड्या! वाहनचालकांचा जीव धोक्यात, पाहा Viral Video
tejas mk1a
विश्लेषण: हवाई दलाची चिंता का वाढतेय?
Accident Viral Video
प्रत्येकवेळी नशीब साथ नाही देत मित्रा; भर वेगात चार कार आमने-सामने; VIDEO पाहून सांगा चूक नक्की कुणाची?

दिल्लीहून वाराणसीला गेलेल्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6 ई 2235 मध्ये, एसी टेक ऑफ करण्यापूर्वीही काम करत नव्हता. एसी काम करत नसल्याने विमानात उपस्थित प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आणि तीन प्रवासी बेशुद्धही झाले, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या सर्वांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर बाब म्हणजे टेक-ऑफपूर्वीही प्रवाशांनी फ्लाइटच्या क्रुझबाबत तक्रारी केल्या होत्या मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

अशा प्रकारे एसी बंद असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शिवाय, उष्मा आणि आर्द्रतेमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. प्रवासादरम्यान विमानातच प्रवाशांचा राग अनावर झाला. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेली एक व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणताना दिसली, ‘आम्ही इतके वेडे आहोत की आम्ही एसी पुन्हा पुन्हा दुरुस्त करायला सांगत आहोत. आमच्या आयुष्याची चेष्टा करताय तुम्ही असं म्हणत प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.इंडिगो फ्लाइटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जेव्हा लोक विमानात गेले तेव्हा विमानाच्या एसीत बिघाड झालेला होता. प्रवाशांना वाटलं की, टेक ऑफवेळी एसी सुरु होईल, परंतु,तेव्हाही एसी सुरु झाला नाही. लोकांना विमानात बसण्यापासून लँडिंग करण्यापर्यंत भीषण गरमीचा सामना करावा लागला. त्यांना गरमीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! पाकिस्तानी व्यक्तीने सिंहिणीसोबत केले असे कृत्य की…; VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १६००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.त्यावर लिहिले आहे ‘बिझनेस क्लास ॲटिट्यूड विथ सीट इन इकॉनॉमी.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, इंडिगो, तुम्हाला काय अडचण आहे, प्रत्येक वेळी लोक तुमच्या सेवेबद्दल तक्रार करत राहतात.