Viral video: नैसर्गिक विधीसाठी एखादी व्यक्ती टॉयलेटमध्ये जाते आणि अचानक टॉयलेटमध्येच किंग कोब्रा सारखा भयानक साप आढळला तर? किती भयानक प्रसंग आहे. अशा प्रसंगाचा आपण एखादवेळेला विचार करु शकतो, किंवा एखाद्या वाईट स्वप्नात असा प्रसंग आपण पाहू शकतो. पण एका भयानक घटनेत, चालत्या ट्रेनच्या शौचालयात एक साप सापडला. कर्मचाऱ्यांनी सापाला वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिले. या घटनेचा व्हिडिओसोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिब्रूगड राजधानी एक्सप्रेसच्या शौचालयात हा साप आढळला. वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या शौचालयात धोकादायक साप पाहून प्रवासी हैराण झाले आणि घाबरले. साप ट्रेनच्या शौचालयात कसा पोहोचला आणि ट्रेनच्या छतावर कसा चढला याबद्दल काहीच कळलं नाही.

काही दिवसांपासून असेच काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये साप कधी गाडीच्या चाकात अडकलेला दिसतो, तर कधी बुटाच्या आत दिसतो. असे थरकाप उडविणारे व्हिडीओ पाहिल्यावर कोणाच्याही अंगावर सहजपणे काटा येतो.असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ही घटना ४ मे रोजी फालाकाटा येथे १२४२४ दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस क्रमांकाच्या ट्रेनमध्ये घडली. ३ मे रोजी नवी दिल्लीहून निघालेल्या ट्रेननंतर हा साप दिसला. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, कोच क्रमांक २४३५७८ (ए-३) च्या टॉयलेटच्या छतावरील ट्यूबलाईटवर साप रेंगाळत होता.

शौचालयात जाताना एका प्रवाशाने साप पाहिल्यानंतर त्याने शौचालयात साप असल्याची तक्रार केली. घाबरलेल्या अवस्थेत प्रवाशाने शौचालयातून बाहेर पडून रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रेल्वे कर्मचाऱ्यांपैकी एकाने प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून सापाला पकडले आहे. तो माणूस सापाला बॅगेत पकडतो आणि सावधपणे कोचच्या गेटकडे जातो. त्यानंतर गेट उघडतो, सापाला बॅगेत गुंडाळतो आणि वेगाने येणाऱ्या ट्रेनमधून बाहेर फेकतो.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @BandhuNews_in नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर वापरकर्त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एकानं म्हंटलंय की, ही खूप गंभीर बाब आहे.