Accident video: सोशल मीडियावर दररोज अपघातांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे घडून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील बडगाम जिल्ह्यातील करालपोरा परिसरात अपघाताची दु:खद घटना समोर येत आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली होती ज्यामुळे एक तरुण श्वानाला पाहताच रस्त्यावर पळण्याचा प्रयत्न करतो. परंतु दुर्दैवाने पळून तो स्वत:ला सुरक्षित करत नाही तर दुसऱ्या मोठ्या संकटात स्वत:ला अडकवतो. तरुण कुत्र्यापासून पळून जसा रस्त्यावर धावू लागतो अगदी त्याच क्षणी समोरुन एक वेगाने धावणारी गाडी त्याला धडकते आणि गाडीखाली तरुण वाईटरित्या चिरडला जातो.
कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, तरुण शांतपणे रस्त्याच्या बाजूने चालत असतो. परंतु याचवेळी काही भटके कुत्रे त्याच्यावर हल्ला चढवतात, ते तरुणाच्या मागे धावू लागतात. परिणामी रस्त्यावरील गाड्या न तपासता तरुण सुस्साट रस्त्यावर धावू लागतो आणि याचवेळी समोरुन येणारी एक वेगवान गाडी त्याला वाईटरित्या चिरडते. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. गाडीची धडक इतकी जबरदस्त असते की तरुण रस्त्यावरच बेशुद्ध पडतो.
पाहा व्हिडीओ
याच भटक्या कुत्र्यांसाठी पालिका उपाययोजना करत असते. त्यांना वेळच्या वेळी इंजेक्शन देणे यांसारखी काळजी घेतली जाते. प्रशासनाची गाडी येते आणि कुत्र्यांना घेऊन जाते. मात्र तरीही त्यांच्या हल्ल्याचं प्रमाण की होताना दिसत नाही.
