Shocking news: घरात लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. अन्यथा लहान मुले काय खातील, काय तोंडात घालतील, याचा नेम राहत नाही. कोणी सेफ्टी पिन गिळली, कोणाच्या नाकात शेंगदाणा अडकला, तर कोणी खेळण्यातील बटण, बॅटरी गिळली असे अजब प्रकार पहायला मिळतात. मात्र सध्या समोर आलेली घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे, कारण एका ३ वर्षांच्या चिमुकलीनं बंदुकीला खेळणं समजत स्वत:वरच गोळी झाडलीय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
खेळता-खेळता स्वत:वरच गोळी झाडली
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातील सोफ्यावर एक बंदूक दिसत आहे आणि तिथे आजूबाजूला एक चिमुकली खेळताना दिसत आहे. तर एक व्यक्ती लॅपटॉपवर बिझी आहे. ती मुलगी सोफ्याजवळ जाते आणि बंदूक हातात घेतात. तिने हातात बंदूक घेतल्यावर एक गोळी झाडते. त्यानंतर मुलगी आरडाओरडा करते. गोळीचा आवाज ऐकताच तो व्यक्ती त्याच्या हातून बंदूक घेण्याचा प्रयत्न करतो. गोळीचा आवाज ऐकताच घरातील इतर मंडळीही धावत येतात, त्याशिवाय घरात तीन कुत्रे असतात. तेही घाबरून इकडेतिकडे पळायला लागतात. सर्व जण घाबरलेले दिसत आहेत तर चिमुकलीही खाली कोसळताना यामध्ये दिसत आहे.
संबंधित व्यक्तीला अटक
चिमुकलीला निक्लॉस चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना फ्लोरिडामधील आहे. द न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मुलीच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती तिचा नातेवाईक होता. तिचं नाव ओरलँडो असून त्याला अटक करण्यात आली आहे. बंदूक निष्काळजीपणे वापरल्याचा आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धक्कादायक! गुजरातमध्ये आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू, घटनेचा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी पालकांवर संताप व्यक्त करत आहेत. पालकांचं लक्ष नसल्यामुळे तसेच बंदूक कोण सोफ्यावर ठेवतं असे संतापजनक प्रश्न नेटकरी विचारत आहेत.