Mumbai local Fighting Video: मुंबई लोकलमध्ये दर मिनिटांला लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. मग असंख्य प्रवाशांनी भरलेल्या लोकलमध्ये अनेक घडामोडी घडत असतात. अनेकदा महिलांमध्ये किरकोळ कारणांवरुन हातापायी तर कधी तूफान वादावादी, मात्र सध्या पुन्हा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,मात्र मुंबईतील लोकलमध्ये झालेली हाणामारी महिला वर्गाची नसुन चक्क पुरुषांची आहे. प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात.

आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक विरार लोकलमधील दोन पुरुषांमधील राड्याचा भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विरार लोकल वेगात धावत आहे आणि यावेळी लोकलच्या दरवाजात उभ्या दोन पुरुषांमध्ये बाचाबाची सुरु होते. याचं नंतर हाणामारीमध्ये रुपांतर होऊन त्यातला एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाची मान धरत अक्षरश: लोकलच्या बाहेर ढकलत आहे. यावेळी एक चूक त्याच्या जीवावर बेतू शकते अशी परिस्थिती दिसत आहे. या दोघांना अनेक जण ओरडून शांत राहण्यास सांगत आहेत मात्र दोन्ही प्रवासी एकमेकांवर तुटून पडले आहेत. यामध्ये तोल जाऊ मागच्या मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर कधी लोकलच्या दरवाजात उभं राहण्यावरुन नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. असाच एक प्रकार मुंबई लोकलमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होतांना दिसतात. लोकलमधील गर्दी, चौथ्या सिटसाठी हाणामारी होत असते.

पाहा व्हिडीओ

लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ chalo.virar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हंटलंय “दादा क्षणभराचा राग आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल” तर आणखी एकानं म्हंटलंय की “एक चूक अन् खेळ खल्लास होईल बघा”

Story img Loader