काही कंपन्या घरबसल्या सेवा देणारी प्रसिद्ध ऑनलाइन कंपन्याआहे. या कंपनीद्वारे ऑनलाइन स्वरूपात ऑर्डर घेऊन ग्राहकांना मसाज, ब्युटी, क्लीनिंग अशा विविध सेवा थेट घरी उपलब्ध करून दिल्या जातात. सोई-सुविधा आणि विश्वासार्ह सेवा यांमुळे अर्बन कंपनीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. अशातच अर्बन कंपनीशी संबंधित व्यक्तीकडून एक धक्कादायक घटना घडली आहे.
हा व्हिडीओ वडाळा येथील एका घरात घडलेल्या गोंधळाचा आहे. कंपनीकडून आलेली मसाज थेरपिस्ट आणि घरातील महिला यांच्यात झालेल्या जोरदार वादाचे दृश्य या व्हिडीओत दिसते. मसाज सेशन रद्द केल्यावर थेरपिस्ट घर सोडण्यास नकार देत असल्यामुळे हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.
वडाळा पूर्व भागात राहणाऱ्या ४६ वर्षांच्या एका महिलेने मसाज सेशन रद्द केल्यामुळे तिला थेट तिच्या घरातच मसाज थेरपिस्टने मारहाण केल्याचा आरोप केला गेला आहे. या घटनेसंबंधीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला त्या दोघींमध्ये छोट्या प्रमाणात वाद झाला; पण नंतर तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की, ते प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्या घटनेनंतर अर्बन कंपनीने संबंधित मसाज थेरपिस्ट व्यक्तीला नोकरीतून दूर केले आहे.
व्हायरल व्हिडीओत मसाज थेरपिस्ट फोन मध्ये शूट करत असते घरातील बेडरूममध्ये उभी असल्याचे दिसतं. घरमालक महिला तिला नीटपणे घराबाहेर जाण्यास सांगत आहेत. त्यावर “घरात उभी राहून बदतमीजी करू नकोस,” असं ती थेरपिस्ट म्हणताना दिसते. दोघींमध्ये बॅग खेचण्यावरून ओढाताण होते आणि काही क्षणांतच हा शाब्दिक वाद मारामारीत रूपांतरीत होतो.
पाहा व्हिडीओ
त्यानंतरच्या दृश्यात घरमालक महिला थेरपिस्टला बेडवर फेकताना दिसते; मग थेरपिस्टही तिचे केस ओढते. हा सगळा प्रकार घरातील मुलगा मोबाईलमध्ये शूट करीत असल्याचं ऐकू येतं. “ही माझ्या आईला मारतेय, पोलिसांना बोलावतो,” असं तो ओरडतो. सगळा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काही लोकांनी महिलेला पाठिंबा दिला असून “घरात येऊन मारहाण करणं चुकीचं आहे” असं म्हटलं आहे. काहींनी दोघींच्याही वागणुकीवर प्रश्नांद्वारे मतं व्यक्त केली आहेत. “प्रोफेशनल सर्व्हिस देणारी व्यक्ती अशी वागू शकत नाही”, “कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर दोघांनीही संयम ठेवायला हवा” अशा प्रतिक्रिया दिसत आहेत. काही युजर्सनी अर्बन कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही टीका केली आहे.
