Pregnant Women Accident Viral Video : गरोदरपणात डोहाळजेवण अर्थात बेबी शॉवर हा एक आनंदसोहळा असतो. त्यासाठी हल्ली अनेक जो़डपी सजावटीपासून विविध प्लॅनिंग करीत असतात. घरात येणाऱ्या लहानशा बाळामुळे आई-बाबा, आजी–आजोबा आणि घरातील सगळेच उत्साही असतात. डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाची एक वेगळीच मजा असते. दरम्यान, केवळ भारतातच नाही तर परदेशातही अशा प्रकारचा कार्यक्रम केला जातो. परदेशात जोडपी यानिमित्ताने जेंडर रिवील पार्टी ठेवतात, ज्यात ते जोडपं कुटुंब, आप्तस्वकीय, मित्रपरिवाराला त्यांच्या आनंदाची बातमी देतात. अशा प्रकारची एक पार्टी एका जोडप्यानं आयोजित केली होती; मात्र त्या पार्टीत गर्भवती पत्नीबरोबर अशी काही दुर्घटना घडली की, सर्वच जण खूप घाबरले. त्या प्रसंगाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पार्टीदरम्यान जोडप्यासह त्यांची मित्रमंडळी आणि कुटुंबीयदेखील खूप आनंदात होते. मजा-मस्तीत सर्व कार्यक्रम सुरू झाला; पण जेंडर रिवील करीत असताना आनंदाच्या भरात गर्भवती महिलेबरोबर अशी काही भयंकर दुर्घटना घडली की, सर्वच जण घाबरले.
गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलेला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण- त्यांच्या एका चुकीमुळे गर्भपात होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी डॉक्टर गर्भवती महिलांना उड्या मारण्यास, जोरात धावण्यास मनाई करतात. पण, बऱ्याचदा गर्भवती महिला उत्साहाच्या भरात या गोष्टींची काळजी घेणं विसरतात आणि मग मोठी दुर्घटना घडते. या व्हिडीओतही गर्भवती महिलेच्या बाबतीत तेच घडलं. या दुर्घटनेत ती जोरात खाली कोसळली. नंतर असं काही घडलं की, पाहणाऱ्यांनाही धक्का बसला.
जोडप्यानं सर्वांना गुड न्यूज देण्यासाठी ठेवली जेंडर रिवील पार्टी
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका जोडप्यानं सर्वांना गुड न्यूज देण्यासाठी जेंडर रिवील पार्टीचं आयोजन केलं आहे. त्यासाठी एका हॉलमध्ये खास सजावट करण्यात आली आहे. तिथल्या स्टेजवर गर्ल-बॉय असं लिहिलेले दोन फॅन्सी बॅनर आहेत. यावेळी स्टेजवर गर्भवती महिला, तिचा पती आणि तिच्या जवळचे काही लोकही उभे आहेत, जे जोडप्याच्या आनंदात सहभागी झाले आहेत. याचदरम्यान जोडपं एका बॉक्सवर जोरात प्रेस करून जेंडर रिवील करतात. तेव्हा गर्ल लिहिलेल्या बॅनरमागून गुलाबी रंगाचे भरपूर पाणी लोकांवर पडू लागते, ज्यात गर्भवती महिलेसह तिचा पती आणि सर्वच जण आनंदाने उड्या मारू लागतात. पण, याचदरम्यान गर्भवती महिलेचा पाय घसरतो आणि ती खाली कोसळते. कोसळल्यानंतर ती पुन्हा उठण्याचा प्रयत्न करते; पण पुन्हा तिचा पाय पाण्यामुळे निसटतो आणि ती खाली पडते. हे पाहून तिचा पती पटकन धावत येत येत तिला सावरतो आणि घट्ट मिठी मारतो. सुदैवानं यात गर्भवती महिलेला काहीही होत नाही. या दुर्घटनेनं सर्वच जण काळजीत पडतात; पण महिला सर्व काही ओके असल्याचं म्हणत पुन्हा आनंदात हसू लागते.
हा व्हिडीओ genderrevealmiami नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्सही केल्यात. अनेकांनी म्हटले की, गर्भवती महिलेबरोबर असा अपघात होणं हे खूपच धोकादायक असतं; तर काहींनी एखादी व्यक्ती उत्साहात आपलं भान हरपून बसते तेव्हा अशी घटना घडते, असं म्हटलं आहे.