scorecardresearch

Shocking Video: चक्कर येऊन प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर पडला शिपाई, अंगावरून मालगाडी गेल्याने मृत्यू

एक शिपाई रेल्वे ट्रॅकवर उभा असताना चक्कर आली आणि थेट मृत्यू झाला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Viral_Video_train
Shocking Video: चक्कर येऊन प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर पडला शिपाई, अंगावरून मालगाडी गेल्याने मृत्यू

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून अनेकदा धक्का बसतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक शिपाई रेल्वे ट्रॅकवर उभा असताना चक्कर आली आणि थेट मृत्यू झाला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आगरा राजामंडी रेल्वे स्थानकातील आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक शिपाई रेल्वे स्थानकावर ड्युटीवर होता प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचं दिसत आहे. तेव्हा त्याची तब्येत बिघडल्याने त्याला चक्कर आली आणि प्लॅटफॉर्मवर पडला. त्याच्या आसपास कुणीच नसल्याने धावत्या मालगाडी खाली गेला आणि मृत्यू झाला. जवळ बसलेल्या शिपायाला अंदाज देखील आला नाही आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. @AdityaT35866479 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘खूप दुःखद: आग्रा येथे शनिवारी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी एक मालगाडी स्टेशनवरून जात असताना रिंगल कुमार सिंह ट्रेनपासून काही अंतरावर उभे होते. अचानक 9 वाजून 31 मिनिटे 50 सेकंदाला रिंगल कुमार यांची तब्येत बिघडली आणि चक्कर आली. त्यांचा मृत्यू झाला. ही घटना राजामंडी रेल्वे स्थानकातील आहे’.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत. अनेकांनी आपल्या भावना या व्हिडीओखाली व्यक्त केल्या आहेत. अशी घटना पुन्हा घडू अशी प्रार्थना करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shocking video viral of death police man fell on the track rmt