Shocking video: लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल फोनचं व्यसन लागलं आहे. काही मुलांना जर मोबाईल फोन दिला नाही तर, ते जेवत देखील नाही. व्हिडिओ किंवा मोबाईल गेम खेळत त्यांना भरवावे लागते. मुलं इतकी हट्टीपणा करतात की शेवटी पालकांना आपल्या पाल्यांचे ऐकावे लागते. अनेक पालक मुलांना जेवण भरवताना त्यांच्या हातात मोबाईल फोन देतात. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे त्यांच्या मानसिक यासह शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की, सतत मोबाइल पहाणे मुलांसाठी खूप वाईट सवय असू शकते. पूर्वी घरातले सर्वजण एकत्र जेवायला बसत असत यावेळी दिवसभर काय झालं यावर चर्चा होत असत. याचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावरही परिणाम व्हायचा मात्र आता एकत्र जेवण फारशा घरांमध्ये होत नाही. अशावेळी मुलं मोबाईलसाठी हट्ट धरतात. जास्त स्क्रीन टाइम मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात. तसेच मानसिक विकासावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

दरम्यान सध्या सोशल मीडयावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये, एका १० वर्षाच्या मुलाने आपल्या आईवरच हात उगारला आहे. या मुलाच्या आईने त्याचा फोन काढून घेतल्याने मुलाला संताप आला आणि त्याने आपल्या आईला पाठीत दणादणा बुक्क्या मारायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओमुळे पालकांमध्ये मुलांच्या मानिसक आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे. पण मायेनं डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नसेल तर कशालाही किंमत नाही. आईची किंमत ही आई गेल्यावरच कळते असं नेहमी आपण एकत आलोय. काहींना आईची किंमत कळते तर काहींना आईच नकोशी झालेली असते. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला तिच आई नकोशी कशी होत असेल. तिच्याच जिवावर उठायची हिमंत कशी होत असेल. याआधीही अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, दरम्यान अशीच एक संतापजनक घटना सध्या समोर आली आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आपल्या आईला मारताना दिसत आहे. तो तिला पाठीत बुक्क्या घालत आहे. त्याने तिला खाली वाकवून दणादणा मारले आहे. आईच्या हातात उलातने असून ती देखील स्वत:ला सोडवत त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मुलगा अतिशय संतापलेला दिसत आहे. तिचे केस धरुन तिला मारत आहे. शेवटी आणखी मुलगा तिथे येतो आणि आपल्या आईला वाचवायचा प्रयत्न करतो.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडाियावर हा व्हिडीओ @SonOfBharat_88 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.