Viral video: सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या पर्यटकांचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये बघता बघता तीन महिला वाहून गेल्या आहेत, याचा थरारक व्हिडीओ आता व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आधीच दोन महिला आणि एक लहान मुलगा धबधब्याच्या पुढच्या बाजूला उभे राहून फोटो काढत आहेत. यावेळी आणखी एक महिला त्यांच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जाते आणि होत्याचं नव्हतं होत. अचानक धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढतो आणि या प्रचंड पाण्यात तीन महिला आणि लहान मुलगा अक्षरश: क्षणात वाहून जातात. या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की क्षणात सर्वजण दिसेनासे झाले.
अनेक कुटुंब आपल्या लहान मुलांसह धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. व्हिडीओच्या सुरुवातीला अनेक नागरिक येथे मजामस्ती करताना दिसत आहेत. हे एक संपूर्ण कुटुंबच असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, काही वेळानंतर येथील चित्रच पालटलं. अवघ्या पाच सेकंदात अचानक पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली.
अवघ्या काही सेकंदांत वाहून गेले
अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओत काही पर्यटक पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक पाण्याचा मोठा झोत येतो आणि काही पर्यटकांना प्रवाहाबरोबर घेऊन जातो. हे सर्व काही इतक्या अचानक घडलंय की, लोकांना काही समजलेच नाही. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरडा करतायत हे दिसतेय. दरम्यान ही घटना कुठे घडली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
पाहा व्हिडीओ
या भीषण घटनेचा व्हिडीओ official_vishwa_96k नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये, “मृत्यू कधीच श्रीमंत किंवा गरीब पाहत नाही, तो फक्त कर्म पाहतो, आणि पैशाच्या माज – फक्त माणसापुढेच चालतो कर्मा पुढे भले भले भीक मागतात” असं लिहलं आहे. तसेच व्हिडीओवर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अनेकदा इशारा देऊनही लोक धोकादायक ठिकाणी जातात आणि अंघोळ करतात. त्याचाच परिणाम म्हणजे हा अपघात आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “निसर्गाशी खेळ करू नये.”