Woman booked for assaulting father-in-law: सून आणि सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या वृद्ध सासऱ्याला चपलेनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पीडित सासरे व्हिलचेअरवर बसले होते, त्यांना जागेवरून हालताही येत नव्हतं. सासू आणि सूनेचं नातं हे बाप-लेकीसारखं असतं असं सगळेच म्हणतात मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण आपल्याच वृद्ध सासऱ्यांना ही महिला अमानुषपणे मारहाण करत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.

देशात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात महिलांवरील अत्याचार वारंवार समोर येत असतात. पण सध्या अशी घटना समोर आली ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुनेला सासूकडून मारहाण होताना आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. पण एका गावात सुनेनं क्रूरतेचा कळस गाठत आपल्या आजारी सासऱ्यांना मारहाण केलीय.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

संबंधित घटना तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातली आहे. इथल्या एका महिलेनं नोव्हेंबर महिन्यात आपल्या वृद्ध सासऱ्याला चपलेनं बेदम मारहाण केली होती. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या व्हिडीओत आरोपी महिला आपल्या सासऱ्याला चपलेनं वारंवार मारहाण करताना दिसत आहे. कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये सुरू असलेलं भांडण पाहता, घरातील पाळीव कुत्रा भुंकू लागतो. तो दोघांच्या मध्ये येत भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिला वृद्ध सासऱ्याला मारतच राहते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeluguScribe नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलं”तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “म्हातारी माणसं ही लहान मुलं असतात त्यांना समजून घेतलं पाहिजे”

Story img Loader