Shocking video: आपण अनेकदा बाहेर जेवण करण्याचा प्लॅन करत असतो. तर कधी घरातील एखाद्या सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा प्लॅन करतो. कारण आपल्याला माहित असते की रेस्टॉरंटमध्ये फूड एक्सपायरी किंवा स्वच्छतेशी संबंधित कोणतीही समस्या आढळत नाही. त्यामुळे आपण सगळे मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेत असतो. पण नुकतेच समोर आलेल्या प्रकरणाबद्दल जाणून तुम्हीही डोकं धरून बसाल. मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन खूप आवडीने खाल्ले जाते. तसेच यामध्ये उच्च प्रथिनेयुक्त असते जे शरीरासाठी महत्वाचे असते. जर तुम्हाला नॉनवेज खाणं आवडत असेल तर तुम्ही चिकन अतिशय प्रेमाने खात असाल. तर सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल. कारण एका महिलेला चिकन खाताना त्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला एका हॉटेलमध्ये चिकन खात असताना तिला चिकनमध्ये मोठमोठे किडे रेंगाळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ग्राहकाला दिलेल्या चिकनच्या तुकड्याभोवती अनेक आळ्या रेंगाळताना दिसत आहेत. जेवणाची थाळी पाहिली तर ग्राहकाला काही घास खाल्ल्यानंतर चिनकनमधल्या अळ्या दिसल्या आहेत..बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात हे असले प्रकार म्हणजे हे जिवावर बोतू शकतं.

हिवाळा सुरू होताच मांसाहारी मंडळी चिकनला पसंती देतात. काही व्यक्ती शरीर सुदृढ अर्थात बॉडी बनवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर चिकन खातात. पण हिवाळ्यात चिकन खाण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा.

पाहा व्हिडीओ

भारतात शाकाहारी आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत मांसाहारी आहार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पण हे आपल्या शरिरासाठी किती फायदेशीरआहे हे आपण कधी पाहतो का? दुकानदार कोंबडी जास्त काळ टिकवण्यासाठी ऑक्सिटॉसिनचे इंजेक्शन देत असतात. म्हणूनच चिकन जास्त खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. तसेच हॉटेलमध्येही यावर वेगवेगळी प्रक्रिया केली जाते, मात्र आपण हेच पदार्थ चवीनं खातो आणि नंतर आपल्याच आरोग्यावर याचा परिणाम होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ insta_highway नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरही आता संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching srk