Shocking video: कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. भारतातील चार पवित्र ठिकाण म्हणजेच हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे भरणारा हा कुंभमेळा केवळ धार्मिक मेळावाच नाही तर भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतीक आहे. हा मेळा लाखो लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. महाकुंभमळ्यात गंगास्नान करण्यासाठी देशभरातील लोकं प्रयागराज या ठिकाणी जात आहे. हा कुंभमेळा तब्बल १४४ वर्षांनी आलाय. त्यामुळे शाहीस्नान करून मृत्यूनंतर मोक्ष मिळवण्यासाठी कोरोडो लोकांनी गर्दी केलीये. बरं, ही गर्दी इतकी जास्त आहे की धड मुंगीला सुद्धा उभं राहण्यासाठी जागा नाहीये. अशा स्थितीत आणखी गर्दी करू नका अशी विनंती प्रशासनातर्फे वारंवार केली जातेय. पण आपले पाप धुण्यासाठी लोकं इतकी वेडी झालीयेत की अक्षरश: ट्रेनच्या ट्रेन भरून प्रवास करताहेत.

यावेळी हजारो लोक प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी जात आहे त्यामुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच अतिरिक्त लोकल सोडण्यात आल्या असल्या तरीही सर्व लोकलमध्ये प्रचंड गर्दी आहे. प्रयागराजला जाणाऱ्या अशाच एका ट्रेनमधील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओमध्ये तुम्ही प्रचंड गर्दी पाहू शकता. ट्रेनच्या डब्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त लोकं बसली तर काय घडेल? या सर्व गोष्टी या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. यासाठीच काही तरुणींनी चक्क ट्रेनच्या टॉयलेटमधून प्रवास केला आहे. आता व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडिओने इंटरनेटवर हाहाकार माजवला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी टॉयलेट सीटच्या वर उभी आहे. यावेळी तिचे दोन मित्रही अगदी छोट्याशा जागेत तिच्या शेजारी उभे होते. “मित्रांनो, आम्ही ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आहोत आणि कुंभमेळ्याला जात आहोत,” ती त्यांची परिस्थिती दाखवण्यासाठी कॅमेरा फिरवत बोलत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर mammam5645 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “घरातून मनापासून प्रार्थना केली तरी देवापर्यंत पोहचते”

Story img Loader