Shocking video: व्यसन ही अशी गोष्ट आहे की ती घरे उद्ध्वस्त करते आणि जेव्हा सर्व काही हाताबाहेर जाते तेव्हाच लोकांना याची जाणीव होते. अनेक प्रकरणांमध्ये, नशेत लोक घरातील वस्तूही विकतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्हाला अंमली पदार्थांचे व्यसन मुलांची निरागसता कशी हिरावून घेते हे दिसून येईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हादरून जाण्याची शक्यता आहे. आपण आजूबाजूला अशी अनेक मुलं मुली पाहतो जी नशेच्या आहारी गेलेली असतात. यावेळी अनेकदा पालकंही त्यांना कंटाळलेले आणि हताश झालेले पाहायला मिळतात.मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेगळच चित्र पाहायला मिळालं आहे. यामध्ये चक्क आई नशेच्या आहारी गेल्यामुळे चिमुकला हतबल झाला आहे, आणि याच निराशेतून त्यानं आपल्याच आईवर हात उचलला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

एका लहान मुलाच्या बाबतीत सर्वात वाईट गोष्ट कोणती? तर त्याचे आई-वडिलांची वागणूक व्यवस्थित नसणे. या मुलाच्या नशीबी सुद्धा हेच आलं. ज्या घरांमध्ये या सगळ्या गोष्टी घडतात, तिथे मुलांचं बालपण हरवलं जातं आणि त्यांचा निरागसपणाही बिघडतो.नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, हा धक्कादायक व्हिडीओ तुम्हीलाही विचार करायला भाग पाडेल की अशी कोणती मजबुरी होती ज्यामुळे १० वर्षाच्या मुलाने स्वत:च्या आईला मारले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मूल आपल्या आईला नशेतून उठवण्यासाठी जोरात ओरडत आहे. त्याची आई इतकी नशेत आहे की लहान मूल रडत आहे आपल्याला मारत आहे हे सुद्धा महिलेला कळत नाहीये. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा ती महिला उठत नाही तेव्हा हा चिमुकला आईवर हात उचलतो. आईला मारतानाही चिमुकला आई उठ आई उठ असं सांगत आहे. मात्र महिला नशेत असल्यामुळे तिला काहीच कळत नाहीये. आणि चिमुकलाही हिंमत गमावून बसतो. ही घटना केव्हा आणि कुठे घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य

@cctvidiots नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी तो व्हिडिओ पुन्हा पोस्टही केला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.एका यूजरने लिहिले… सर्व काही करा पण ड्रग्ज कधीच घेऊ नका. आणखी एका युजरने लिहिले… नशा किती वाईट आहे, एका मुलाने आईला मारले. तर दुसऱ्या युजरने लिहिले…”या महिलेला आई म्हणण्याचा अधिकार नाही, मुलानं जे केलं बरोबर केलं.”

Story img Loader