Shocking video: व्यसन ही अशी गोष्ट आहे की ती घरे उद्ध्वस्त करते आणि जेव्हा सर्व काही हाताबाहेर जाते तेव्हाच लोकांना याची जाणीव होते. अनेक प्रकरणांमध्ये, नशेत लोक घरातील वस्तूही विकतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्हाला अंमली पदार्थांचे व्यसन मुलांची निरागसता कशी हिरावून घेते हे दिसून येईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हादरून जाण्याची शक्यता आहे. आपण आजूबाजूला अशी अनेक मुलं मुली पाहतो जी नशेच्या आहारी गेलेली असतात. यावेळी अनेकदा पालकंही त्यांना कंटाळलेले आणि हताश झालेले पाहायला मिळतात.मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेगळच चित्र पाहायला मिळालं आहे. यामध्ये चक्क आई नशेच्या आहारी गेल्यामुळे चिमुकला हतबल झाला आहे, आणि याच निराशेतून त्यानं आपल्याच आईवर हात उचलला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा