scorecardresearch

Video: रील बनवण्यासाठी रेल्वे लाईनच्या खांबावर चढण्याचा मोह नडला, क्षणात अंगातून धूर येऊ लागला अन्…

इतरांपेक्षा काही वेगळा व्हिडिओ बनवण्याच्या नादात हा मुलगा थेट रेल्वे लाईनच्या खांबावर चढला

Video: रील बनवण्यासाठी रेल्वे लाईनच्या खांबावर चढण्याचा मोह नडला, क्षणात अंगातून धूर येऊ लागला अन्…
व्हिडीओतील तरुणाची अवस्था पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. (Photo : Twitter)

सध्याच्या डिजीटल जमान्यात अनेकजणांना रील आणि शॉर्ट्स बनवण्याच वेड लागलं आहे. नवनवीन व्हिडीओ शूट करुन ते इंटरनेटवर पोस्ट कराण्यची क्रेझ खूप वाढली आहे. या रिलसाठी लोक काहीही करायला तयार होतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवणं कधीकधी किती घातक ठरु शकतं याच एक उदाहरण आता समोर आलं आहे.

हेही पाहा- Video: झाडाखाली चहा पित उभ्या राहिलेल्या व्यक्तीवर अचानक ओढावलं संकट, जीवाच्या भीतीने पळाला अन्…

एक तरुण व्हिडिओ बनवण्यासाठी रेल्वे लाईनच्या खांबावर चढला आणि हाय एक्स्टेंशन करंटमुळे जमिनीवर पडल्याच्या घटनेचा धक्कादायक व्हि़डीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओतील तरुणाची अवस्था पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. व्हिडीओतील तरुण सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी व्हिडीओ बनवत होता. त्यासाठी तो रेल्वे रुळाजवळील खांबावर चढला, व्हिडिओ शूट करत असताना अचानक त्याला विजेचा धक्का बसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या धक्याने त्याच्या अंगातील कपडे जळाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- धक्कादायक! पोलिसांनीच केली सहकारी कर्मचाऱ्याला लाठ्यांनी मारहाण, घटनेचा Video होतोय व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये घडली आहे. व्हिडिओत हा तरुण विजेचा शॉक लागून जमिनीवर पडला आहे. शिवाय शरीराला भाजल्यामुळे तो जमीनीवर लोळताना दिसत आहे. त्याचे कपडे पूर्णपणे फाटले असून शरीरातून धूरही निघत आहे. त्यामुळे जे लोक सोशल मीडियावर काही लाईक्स मिळविण्यासाठी जीवाची पर्वा न करत कुठेही रील करण्याचं धाडस करतात. त्यांनी या तरुणाची अवस्था पाहून योग्य तो धडा घ्यावा असं नेटकरी म्हणत आहेत.

नक्की काय घडलं ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूरमुफ्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंडारी गावात काही दिवसांपूर्वी नवीन रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे लाईनजवळ काही मुलं व्हिडिओ शूट करण्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यातील एक अतिउत्साही मुलगा या लाईनच्या खांबावर चढला. शाहरुख अहमद असे खांबावर चढलेल्या १८ वर्षीय मुलाचे नाव आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवण्याच्या नादात मुलगा थेट रेल्वे लाईनच्या खांबावर चढला आणि त्याच वेळी त्याचवेळी विजेच्या धक्क्याने खाली कोसळला आणि जीवाच्या आकांताने ओरडत राहिला.

हेही पाहा- “मला खूप भिती वाटतेय…”, हिमवादळात अडकलेल्या तरुणीचा मृत्यूपूर्वी कुटुंबियांना पाठवलेला Video होतोय व्हायरल

या घटनेनंतर तिथे उपस्थित लोकांनी या मुलाची कपडे जळल्याचं आणि त्याच्या शरीरातून धूर येत असल्याचं पाहिलं मात्र, विजेचा प्रवाह त्या मुलाच्या अंगात असण्याच्या भीतीने कोणीही त्याच्याजवळ गेले नाही. लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 12:02 IST

संबंधित बातम्या