Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणीला आपला जीव धोक्यात घालून रील बनवणं चांगलंच महागात पडलंय. रील बनविताना तिच्याकडून एक चूक झाली आणि ती थेट खोल दरीत कोसळली. याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक तरुणी उंच डोंगराच्या कड्यावर उभी राहून रील बनवत होती. त्यादरम्यान तिचा पाय घसरतो आणि ती दरीत कोसळते. अवघ्या एक मिनिटात हे सगळं घडलं.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
Madhya Pradesh Shocker: Pregnant Woman 'Forced' To Clean Blood-Stained Hospital Bed After Husband's Murder In Dindori
इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही तरुणी डोंगराच्या कड्यावर उभी आहे. यावेळी ती स्वत:चा जीव धोक्यात घालून रील बनविताना दिसत आहे. काही वेळानं ती ओढणी डोक्यावर घेऊन तिथे नाचत असताना अचानक तिचा तोल जाऊन पाय घसरतो आणि ती थेट गोल गोल फिरत दरीत कोसळते. यावेळी तिचा व्हिडीओ काढणाराही आरडाओरड करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Jugad Video: गाडीवर चढून कुत्रे करतात घाण, तरुणानं केला खतरनाक जुगाड; आता कुत्रे काय वाघही येणार नाही गाडीजवळ

जीव एवढा स्वस्त असतो का ?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ palampursamachar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं म्हटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का?” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”

काही महिन्यांआधी महाराष्ट्रात दोन धक्कादायक घटना घडल्या. एक म्हणजे लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी, ३० जून रोजी घडली होती. ती घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटातही एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली.