Shocking video: पावसाळा सुरू होताच पर्यटकांची धबधब्यांना जाण्यासाठी गर्दी होत असते. पावसाळी पर्यटनाला जाण्याचा अनुभव प्रत्येकासाठी ‘रिफ्रेशिंग’ ठरतो. त्यामुळे पहिला पाऊस पडला की लोकांचे पावसाळी सहलींचे नियोजन सुरू होते. दुर्दैवाने या वाढत्या पर्यटनाबरोबरच निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या अपघातांच्या घटनाही पुढे येतात, त्यामुळे आपण खबरदारी घ्यायला हवी. पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. पण, जर पाण्याशी खेळ केला तर तो विनाशही करू शकतो. पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेक जण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांच्यासोबत अघटित घडतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

निसर्गातील एक चूक अन् खेळ खल्लास

While making the reel the young man's foot slipped
‘शायनिंग मारणं जीवावर बेतलं…’ रील बनवण्याच्या नादात तरुणाचा डोंगरावरून पाय घसरला; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘लाइक्सच्या नादात..’
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Madhya Pradesh three friends stuck in Tiktauli Dumdar waterfall in Morena shocking video
धबधब्यावरची मस्ती नडली; तीन मित्र एक दगड अन् पाण्याचा प्रचंड वेग; रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून झोप उडेल
old man was swept away in flood
“एवढी घाई कशाला!”, लोक बघत राहिले अन् डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून गेले आजोबा , Video Viral
Mumbra Dog falls on Girl 4 year old girl dies after dog falls on her in Thane shocking video
पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला अन् चिमुकलीचा जीवच गेला! सीसीटीव्ही VIDEO पाहून कळेल नेमकं काय घडलं?
Thane Dahi Handi 2024 govinda falling from human pyramid 7th base in Dighe Sahebanchi Dahi Handi 2024 shocking video
Shocking VIDEO: सातव्या थरावरुन तोल गेला अन् तो…; ठाण्यात दिघे साहेबांच्या दहीहंडीतला थरार कॅमेऱ्यात कैद
Bike rider fell down on the Road while doing stunt video goes viral
“जीव एवढा स्वस्त असतो का रे?” फेमस होण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
woman head Stuck in bus window
बसच्या खिडकीतून डोकं बाहेर काढणे महिलेला पडले महागात! Viral video पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

सध्या समोर आलेला व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे आणि धबधब्याच्यावर टोकाला हा तरुण उभा आहे. यावेळी तो हालचाल करताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि हा तरुण उंच धबधब्यावरून थेट खाली असलेल्या खडकावर कोसळतो. धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांमध्येही या घटनेनंतर आरडा-ओरडा होतो. अनेक जण यावेळी या तरुणाच्या मदतीला पुढे जाताना दिसत आहेत.

आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं, यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. काही लोक अ‍ॅडव्हेंचरसाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक थ्रिलच्या नादात आपला जीव गमावून बसतात. आता अशीच काहीशी धक्कादायक घटना समोर आली आहे. आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते जीवघेणं ठरू शकतं असं म्हणतात. कधी व्हिडीओ तर कधी सेल्फीच्या नादात अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भर मैदानात मृत्यूचा थरार! पिसाळलेल्या बैलाची टोकदार शिंग पोटात घुसली अन् तरुण क्षणात कोसळला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर nimbahera.update नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “या लोकांना तिकडं जायची गरजच काय पण?” अशा या प्रतिक्रिया आहेत. तुमची एक चूक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, याचीच प्रचिती देणारी ही घटना आहे.