मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी दरवाजापासून दूर उभे राहावे आणि दरवाजाला हात लावू नये अशा सूचना मेट्रो प्रशासनाकडून वारंवार दिल्या जातात. तुम्हीही मेट्रोतून खदी प्रवास केला असेल तर ही सूचना तुम्ही नक्कीच ऐकली असेल. अनेक लोक मेट्रोकडून दिल्या जाणाऱ्या या सूचनांचे पालन करतात. शिवाय ते लोकांच्या सुरक्षिततेसाठीच बनवलेले असतात त्यामुळे त्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. मात्र, काही लोक हे नियम झुगारून नको ते कृत्य करतात, ज्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.

सध्या अशाच एका तरुणाचा मेट्रो प्रवासादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण मेट्रोतून प्रवास करताना निष्काळजीपणा करणार नाहीत. हो कारण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा धावत्या मेट्रोतील एका डब्याचा दरवाजा उघडून उडी मारताना दिसत आहे. मात्र, त्याने या मेट्रोमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारणं किती महागात पडलं आहे. हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजेल.

Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
South Mumbai
आमचा प्रश्न – दक्षिण मुंबई : जर्जर इमारती, चिंचोळ्या गल्ल्या अन् अरूंद रस्ते

हेही पाहा- मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परत येणं कशाला म्हणतात ते एकदा पाहाच; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुण धावत्या मेट्रोत दरवाजाजवळ उभा असल्याचं दिसत आहे. शिवाय मेट्रो भरधाव धावत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. अशातच हा व्यक्ती अचानक हाताने मेट्रोच्या डब्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. कसा तरी तो दरवाजा उघडतो आणि थेट प्लॅटफॉर्मवर उडी मारते. व्हिडीओतील हे दृश्य अत्यंत भयंकर असून ते पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे.

हेही पाहा- तरुणीच्या जबरदस्त डान्सची नेटकऱ्यांना पडली भुरळ; Video पाहून म्हणाले, “नजर हटेना…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ @HowThingsWork_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आ असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो ८ मिलियनहीन अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ पाहणारे नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘जर तो खाली उतरताच मेट्रोच्या दिशेने पळाला असता तर पडला नसता.’ तर दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटलं आहे, ‘आशियातील लोक अनेक वर्षांपासून चालत्या वाहनातून कसे उतरायचे हे शिकत आहेत.’