Shocking Viral video: पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात, बोटींगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूही पर्यटक एकत नाहीत. तरीही पर्यटक नसतं धाडस करतात आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. तलाव, धरणे, समुद्रकिनारी अनेक पर्यटक फिरायला जात असतात. तर अशा ठिकाणी फिरायला गेल्यानंतर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण सध्या एका थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये १६ वर्षाचा मुलगा समुद्राच्या विशाल लाटांमध्ये कसा अडकला आहे बघा.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ अमेरिकेती कॅलिफोर्निया येथील असून यात एका १६ वर्षांच्या मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवल्याचे दिसून आले. समुद्राच्या पाण्यात लहान मुलगा बुडून जात असतानाच १६ वर्षांचा तरुण त्याच्या बचावासाठी धाव घेतो आणि एका देवदूताप्रमाणे त्याचे प्राण वाचवतो. शनिवारी समुद्राच्या लहरी अचानक तीव्र वेगात वाहू लागल्याने १० वर्षांचा चिमुकला या लहारींमध्ये वाईटरित्या अडकला. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की त्याला यातून स्वत:ला वाचवता येत नव्हते.

या कठीण परिस्थितीत अखेर एक १६ वर्षांचा तरुण मदतीसाठी धावून आला आणि त्याने मुलाला खेचत पाण्यातून दूर समुद्रिकिनाऱ्यावर आणले. व्हिडिओमध्ये मुलाला वाचवण्यासाठी तरुणाची धडपड स्पष्ट दिसून येते. माहितीनुसार, हा तरुण एक लाईॉफगार्ड असून त्याच्या प्रसंगावधानाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. घटनेवेळी उपस्थित असलेले काही जण मुलाला वाचवण्यासाठी समुद्रात जाऊ पाहत होते पण लाईफगार्डने त्यांची समजूत काढली. जर तुम्ही यासाठी ट्रेनिंग घेतली नसेल आणि तुम्ही अप्रशिक्षित असाल तर अशा परिस्थितीत समुद्रात जाऊन तुम्ही स्वत:चाही जीव गमवाल असा सल्ला त्याने उपस्थितांना दिला. यानंतर रेस्क्यूची जबाबदारी स्वत:वर घेऊन तो समुद्रात उतरला आणि सुरक्षितपणे मुलाला पाण्यातून बाहेर काढले.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.