Crocodile In Fishing Net Shocking Video : सोशल मीडियावर अनेकदा चक्रावून टाकणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून क्षणभरासाठी काळजाचा ठोका चुकतो. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही मच्छीमार नदीत अगदी आनंदाने मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे ओढताना दिसत आहेत. आज भरपूर मासे मिळतील आणि चांगली कमाई होईल, या अंदाजात ते आनंदी होते; पण जाळं पाण्याबाहेर काढताच त्यांना असा काही भयानक प्राणी दिसतो की, त्याला पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

व्हायरल व्हिडीओत गढूळ पाण्यात निळ्या रंगाचे मोठे जाळे पसरल्याचे दिसते, ज्यामध्ये अनेक मासे तडफडत आहेत. मच्छीमार मोठ्या उत्साहाने जाळे गोळा करीत होते, तितक्यात माशांमध्ये एक विचित्र हालचाल झाली. जवळून पाहिल्यावर समजले की, त्या जाळ्यात माशांबरोबर दोन खतरनाक मगरीसुद्धा अडकल्या आहेत. मगरी अगदी शांतपणे पाण्याच्या तळाशी पोहत त्यांची तोंडे बाहेर काढून उभ्या होत्या. मगरींना पाहताच मच्छीमार घाबरले आणि त्यांना काय करावे हेच सुचेना.

कारण- थोडीशी जरी चूक झाली असती किंवा जाळे ओढताना मगरीने हल्ला केला असता, तर मोठा अपघात घडला असता.

मगरींचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @vikashdev2023 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने फिरकी घेत लिहिले, “मच्छीमारांनी मागितले होते मासे; पण देवाने बरोबर मगरीचा बोनस दिला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “भाऊ, हे मासे पकडणे होते की, थेट यमराजाला आमंत्रण देणे?” काही जण मच्छीमारांच्या धैर्याचे कौतुक करीत आहेत; तर काही जण म्हणत आहेत की, पुढच्या वेळी जाळे टाकण्यापूर्वी हे १०० वेळा विचार करतील.