Girl Crocodile Attack Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही हसवणारे, तर काही फारच भयानक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. व्हिडीओमध्ये घडलेला प्रकार एखाद्या थरारक चित्रपटातील प्रसंगासारखा वाटतो; पण हा प्रकार पूर्णपणे खरा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुणी दिसतेय, जी समुद्राच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेतेय. यावेळी तिच्याबरोबर असं काही घडतं की, जे पाहून तुम्हाला भीती वाटेल.

व्हिडीओत पाहू शकता की, तरुणी हळूहळू समुद्राच्या पाण्यात उतरते. सुरुवातीला ती गुडघाभर पाण्यात जाते आणि तिथेच बसते. काही सेकंदांनंतर ती पूर्णपणे पाण्यात पाठीवर झोपते. अगदी निर्धास्त आणि शांतपणे ती पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असते. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा चिंता दिसत नाही. ती या क्षणाचा आनंद घेत आहे; पण पाण्यात तिच्यासाठी काय लपले आहे याची तिला अजिबात कल्पना नसते.

अचानक समोर आली मगर (crocodile attack on girl in lake video)

अचानक पाण्यात हालचाल सुरू होते. मागून पाणी हलू लागते आणि पुढच्याच क्षणी एक मोठी मगर बाहेर येते. ती थेट तरुणीच्या पायांच्या दिशेने झेपावते. तिचे जबडे उघडलेले असतात आणि ती पूर्णपणे हल्ल्याच्या तयारीत असते. हे सर्व इतक्या वेगाने घडते की, कोणाला काही समजण्याची संधीच मिळत नाही.

तरुणी पूर्णपणे हादरून जाते. थोड्या वेळापूर्वी शांतपणे भिजण्याचा आनंद घेणारी ती तरुणी घाबरून हात-पाय मारू लागते. व्हिडीओमध्ये तिचा आवाज ऐकू येत नसला तरी तिच्या हालचालींवरून ती प्रचंड घाबरल्याचे स्पष्ट दिसते. ती कशीबशी स्वतःला सावरते आणि वेगानं पाण्याबाहेर किनाऱ्याकडे धावते. नशीब बलवत्तर म्हणून मगरीचा नेम चुकला आणि ती तरुणीच्या पायांपासून अवघ्या काही इंच अंतरावर राहिली. एका सेकंदाचा जरी उशीर झाला असता, तरी काय घडले असते या विचारानेच अंगावर काटा येतो.

तरुणी धावत एका सुरक्षित ठिकाणी पोहोचते आणि अशा प्रकारे तिचा जीव अगदी थोडक्यात वाचतो. ही संपूर्ण घटना अवघ्या १०-१५ सेकंदांत घडते; पण पाहणाऱ्याच्या मनात दीर्घकाळ भीती राहते. आता हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून, लोक तो मोठ्या प्रमाणावर शेअर करीत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये युजर्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.