Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणाचा धक्कादायक थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या सिविक सेन्स नावाचा एक विचित्र ट्रेंड गाजतोय. एखादी व्यक्ती रील शूट करत असताना मागून कुणी आले की त्याला सिविक सेन्स नाही असं म्हटलं जातं. पण आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने या ट्रेंडला यूनो रिव्हर्स मोडवर आणलं आहे. म्हणजेच, दुसऱ्याला शहाणपण शिकवणाऱ्या रील बहाद्दरांनाच नेटकऱ्यांनी चांगलंच झापलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकतो यात एक व्यक्ती रेल्वे स्थानकावर उभा असल्याचे दिसते. समोरुन येणाऱ्या रेल्वेला पाहून तो लगेच रेल्वे स्थानकावरुन रेल्वे रुळावर जातो आणि बरोबर रेल्वेच्या समोरच जाऊन उभा राहतो. कदाचित आपल्यात किती जास्त हिम्मत आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत असतो. मात्र, चालकाने या घटनेत प्रसंगावधान दाखवल्याने स्टंटबाजीत तरुणाचा बळी जात नाही. तरुणाला रेल्वे रुळावर उभं पाहून चालक लगेच गाडीला थांबवतो ज्यामुळे मोठी दुर्घटना टळते. गाडी थांबताच तरुण पुन्हा रेल्वे स्थानकावर चढतो आणि तिथून निघून जातो. आपल्या क्षुल्लक रिलसाठी सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार करणे चुकीचे आहे. रेल्वेच्या नियमांनुसार जर एका अधिकऱ्याने तुम्हाला असं करताना पकडलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही.  प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं म्हटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का?” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”