Bear vs Tiger Viral Video: जंगलात ‘राजा’ कोण, हा प्रश्न अनेकांना पडतो… पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका धक्कादायक व्हिडीओनं सगळ्यांचंच गणित बिघडवलं आहे. शांत दिसणाऱ्या एका अस्वलानं असा काही अचानक डाव खेळला, की बलाढ्य वाघालाही क्षणात माघार घेऊन पळ काढावा लागला!

अस्वल आणि वाघ जंगलातील दोन ताकदवान प्राणी… पण जेव्हा हे दोघे आमनेसामने येतात, तेव्हा नेमकं काय घडतं? जंगलातून समोर आलेल्या एका थरारक व्हिडिओने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. ‘जंगलाचा राजा’ मानला जाणारा वाघ एका अस्वलासमोर अक्षरशः घाबरून पळ काढताना दिसतो, आणि हा अनपेक्षित ट्विस्ट पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसणारा प्रसंग इतका रोमहर्षक आहे की, सुरुवातीला सर्वांना वाटतं वाघच हल्ला करणार… पण काही क्षणातच चित्र पूर्णपणे बदलतं. अस्वलाच्या आक्रमक हालचालींमुळे परिस्थिती उलटी होते आणि वाघाला माघार घ्यावी लागते. जंगलातील या दुर्मिळ आणि धक्कादायक क्षणाने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली असून, नेटकरीही या ‘गेम’बद्दल जोरदार चर्चा करत आहेत.

व्हिडीओची सुरुवात अगदी सामान्य वाटते. एक वाघ निवांतपणे रस्त्यावरून चालत असतो. त्याच्या चालण्यात आत्मविश्वास, डोळ्यांत दरारा. आसपास कुणीच नसल्यासारखा तो आपल्या मस्तीत पुढे सरकत असतो; पण पुढच्याच क्षणी दृश्यात अनपेक्षित वळण येतं…

समोरून एक अस्वल शांतपणे पुढे येताना दिसतं. सुरुवातीला तो सामना साधाच वाटतो; जणू दोन बलाढ्य प्राणी एकमेकांना टाळून निघून जातील. पण, अचानक परिस्थिती उलटी होते. अस्वल क्षणात आक्रमक होतं… डोळ्यांत ज्वाला, हालचालींत वेग आणि कोणतीही भीती न बाळगता, ते सरळ वाघाच्या दिशेनं झेपावतं.

हा अनपेक्षित हल्ला पाहून वाघ अक्षरशः गोंधळून जातो. प्रतिकार करण्याऐवजी तो लगेच मागे फिरतो आणि भीतीनं शेपूट घालून झुडपांत पळ काढतो. काही क्षणांपूर्वी दबदबा दाखवणारा ‘जंगलाचा राजा’ असा घाबरलेला पाहून पाहणारेही थक्क होतात.

थरार इथेच संपत नाही… अस्वल वाघाचा पाठलाग करीत त्याच्यामागे धावतं आणि जंगलाच्या आतपर्यंत त्याला पळून जायला भाग पाडतं. या काही सेकंदांच्या प्रसंगात जंगलातील शक्तीचं पारडं कसं क्षणात बदलू शकतं, याचं जिवंत चित्र दिसतं.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघ अत्यंत शक्तिशाली आणि चपळ शिकारी असला तरी अस्वल त्याच्या अनपेक्षित स्वभावासाठी आणि निडर वृत्तीमुळे ओळखलं जातं. विशेषतः स्वतःचा परिसर किंवा सुरक्षितता धोक्यात आली, असं वाटलं तर अस्वल अत्यंत आक्रमक होतं आणि त्याच क्षणी ते कोणालाही मागे हटायला भाग पाडू शकतं.

हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद होताच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. “अस्वलानं वाघाला पळवलं” या एका प्रश्नानंच नेटिझन्सना अक्षरशः चकित केलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आश्चर्य व्यक्त केलं.

येथे पाहा व्हिडीओ

हा थरारक प्रसंग उत्तर प्रदेशातील पीलीभीत टायगर रिझर्व्हमध्ये घडला असून, वन्यजीव अभ्यासक मनिंदर सिंह धालीवाल यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.