Oh Stree Kal Phir Aana : सोशल मीडियावर दर दिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी आजूबाजूला घडणार्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. तुम्ही पुणेरी पाट्यांविषयी अनेकदा ऐकले असेल. पुणेरी पाट्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात पण फक्त पुणेरी पाट्याच नाही तर कधी कधी दुकानावरील पाट्या, मंदिरातील पाट्यासुद्धा आश्चर्यचकीत करणाऱ्या असतात.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका दुकानावर लावलेल्या नावाच्या बॅनरचा आहे. दुकान मालकाने त्याच्या दुकानाचे अनोखे नाव ठेवले आहे आणि त्याला मजेशीर अशी टॅगलाईन दिली आहे. ही पाटी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
तुम्ही दुकानावर लावलेल्या पाट्या, दुकानाच्या नावाचे फलक अनेकदा पाहिले असेल पण अशी पाटी कधीही पाहिली नसेल. हा व्हायरल फोटो एका दुकानाच्या नाम फलकाचा आहे. या नाम फलकावर दुकानाचे नाव लिहिलेय, “स्त्री Collection” आणि त्या खाली टॅगलाइन लिहिली आहे, “ओ स्त्री कल फिर आना” ही पाटी पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. दुकानदाराची मार्केटिंग स्टाइट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : Accident Video : लोक का ओव्हरटेक करतात? कारला ओव्हरटेक करणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
व्हायरल फोटो पाहा
Phunsuk Wangdu या एक्स अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटो च्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मार्केटिंग लेव्हल” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त मार्केटिंग केली” तर एका युजरने लिहिलेय, “जर खरंच स्त्री आली तर…” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा लोक कसे काय करतात, हे विचार आपल्या डोक्यात का येत नाही?” या फोटोवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना दुकान मालकाची क्रिएटिव्हीटी खूप आवडली आहे.
“ओ स्त्री कल फिर आना”
“ओ स्त्री कल फिर आना” हा लोकप्रिय डायलॉग ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातील आहे. ‘स्त्री’ या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भुमिकेत आहे. या चित्रपटात अनेक डायलॉग आहे पण हा डायलॉग प्रचंड गाजलेला आहे त्यामुळे लोक या डायलॉगचा मीम्स, ज्योक्स, व्हिडीओ, एवढंच काय तर मार्केटिंगसाठी सुद्धा वापर करत आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग आले आहे.