Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी अनेक कारण देऊन पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत. उधार मागणाऱ्या ग्राहकांच्या जाचाला कंटाळून ही पाटी लावली आहे. या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं.
दुकानात अशी पाटी लागली आहे. याद्वारे दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. त्याने वैतागून उधारी बंद केली होती. परंतू त्याचे ग्राहक सारखे त्याच्यामागे उधारी मागत होते. यामुळे हा दुकानदार आणखी त्रस्त झाला होता. यामुळे दुकानदाराने उधारी पुन्हा सुरु करण्यासाठी ही पाटी लावली आहे. ही पाटी आता शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकांना उधारी मागणे सुरुच ठेवले होते. प्रत्येकाला नाही नाही सांगून वैतागल्याने शेवटी अशी पाटी लावली आहे.
आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावरील एका विक्रेत्याने उधारी बंद करण्यासाठी अजब मार्ग शोधला आहे. एका रस्त्यावरील विक्रेत्याने त्याच्या स्टॉलवर लावलेला बोर्ड सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, “उधारी बंद आहे कारण…हिशोब करायला माणूस नाही, सकाळ-संध्याकाळ चकरा मारायला गाडी नाही, सारखा सारखा फोन करायला मोबाईलमध्ये बॅलन्स नाही, भांडण करु पैसे मागायला आम्ही काही गुंड पण नाही राव, तुम्ही येण्याची वाट पाहत बसायला आम्ही काही आरोपी नाही, कुबेरसाहेब आमचे नातेवाईक नाहीत. आणि शेवटी लिहलं आहे की, ग्राहक म्हणजे राजा आणि राजा कधी उधारी मागतो का? अशी पाटी या विक्रेत्यानं लिहली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होताच हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर टाईमपास करणाऱ्या ग्राहकासांठी जबरदस्त मेन्यू; PHOTO पाहून पोट धरुन हसाल
@aapalviralpune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.