Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? पण, काही व्हिडीओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. असं म्हणतात, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला माणुसकीचे दर्शन घडून येईल.
विठ्ठल पंढरीचा पांडुरंग कधी, कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येईल त्याचा तोची जाणे…असेच एक ९३ वर्षीय आजोबा बायकोला गळ्यातलं घेण्यासाठी शहरात आले, पण दुकानदाराने जे केलं त्याने मन जिंकलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “यापेक्षा वेगळं पुण्य काय असतं?”
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सोनाराच्या दुकानात ९३ वर्षाचे आजोबा आणि त्यांची पत्नी आलेले आहेत. यावेळी या आजोबांना त्यांच्या बायकोसाठी माळ घ्यायची आहे असं ते म्हणत आहेत. यावर दुकानदार म्हणत आहे की, बाबा पैसे किती आणले ? तेव्हा हे आजोबा अकराशे रुपये आणि काही चिल्लर असल्याच दाखवतात. यावर या दुकानदाराने हे सर्व पैसे नाकारले आणि त्यांना दागीने असेच देऊ केले. यावर हे आजोबा तरीही पैसे घेण्यासाठी दुकानदाराला सांगताना दिसत आहेत. मात्र दुकानदार “पांडुरंगाचा आणि तुमचा आशिर्वाद सगळं कल्याणच कल्याण आहे.” असं म्हणत एकही रुपया घेत नाही. दुकानदाराच्या याच कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @VVipinpatel नावाच्या एक्स काऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हला आयुष्यात कधीच काही कमी पाडणार नाही तुमच्या साठी सदैव प्रार्थना करू, खूप सुंदर तुमच्याकडून आदर्श घेयला हवा नक्कीच ते आज्जी आजोबा किती सुंदर आणि खळखळून हसले तिथंच तुम्हाला पांडुरंगाणे आशीर्वाद दिला.” तर दुसरा म्हणतो, “सोन्याच्या दुकानदाराचे सोन्याचे मन…. दादा खूप आशीर्वाद. दुकानदार राजा माणूस आहे दुकान बी सोन्याचा आहे आणि मन पण सोन्यासारखा साफ आहे.” तर आणखी एकानं “विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” मन जिंकलं दादा तू तू खूप मोठा होणार आहे तुला त्या माय पित्याचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद निश्चितपणे मिळाला आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.