Shopkeeper Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओतील डान्स काहीवेळा खरंच आश्चर्यकारक असतात, तर काही पोट धरून हसायला लावतात. यात काही भन्नाट आणि हटके डान्स व्हिडीओंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यात एक दुकानदार काका असा काही डान्स करतायत की, तुम्ही पाहातच राहाल.

कपड्याच्या दुकानात उभे राहून ते काका अशी काही अदाकारी दाखवतायत की पाहून तुम्हीही चक्रावून जाल. यात ते बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गाणं ”देखा है पहली बार”वर जबरदस्त डान्स करून सर्वांची मनं जिंकतायत.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कपड्याचे दुकान स्पष्टपणे दिसतेय, ज्यामध्ये असंख्य शर्ट आणि टी-शर्ट्स टांगलेले आहेत. याच दुकानात उभं राहून दुकानदार काका जबरदस्त डान्स करताना दिसतायत. “देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार” या गाण्यावर ते आपली अदाकारी दाखवतायत, कधी कंबरेने ठुमके लगावतायत, तर कधी चेहऱ्यावर सुंदर एक्स्प्रेशन दाखवतायत. यात त्यांनी इतक्या परफेक्ट एक्स्प्रेशन, हावभाव दाखवून सर्वांची मनं जिंकली आहेत.

जबरदस्त डान्स करणाऱ्या या दुकानदार काकांचे नाव संजू लामा आहे, जे कपड्यांचे दुकान चालवतात, परंतु त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून असे दिसते की, डान्स ही त्यांची आवड आहे. हा अद्भुत डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर त्यांच्या sanjulama5 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी म्हटले, “जबदस्त डान्स,” तर काहींनी त्याला “एक सुंदर सादरीकरण” म्हटले. एकाने लिहिले की, “तुझ्या डान्सपुढे माधुरी दीक्षित फेल,” तर दुसऱ्याने लिहिले, “वाह, यार! तू खूप छान नाचलास.” त्याचप्रमाणे इतर अनेक युजर्सनीही दुकानदाराच्या डान्सचे कौतुक केले आहे.