Shopkeeper Shocking Video : तुमच्या शहरातही चाट-समोशांची अनेक दुकानं असतील; पण त्यातील काही समोसे विक्रेतेच प्रसिद्ध असतील. कारण- काही लोकांना त्या दुकानातील समोशाची चव आवडते, तर काहींना त्यांची बनविण्याची पद्धत आवडते. त्यामुळे आपल्या परिसरात समोशांची कितीही का दुकाने असोत; पण आपण प्रसिद्ध अशा दुकानातीलच समोसा खाणे पसंत करतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका समोसाविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात विक्रेत्याची समोसा बनविण्याची पद्धत पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहे.

विक्रेत्याने उकळत्या तेलात घातला हात

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती समोशाच्या दुकानाजवळील एका जागेत समोसे बनविताना दिसत आहे. यावेळी कढईत तेल चांगले उकळत आहे, त्यात त्याने काही समोसे तळण्यासाठी सोडले आहेत. याचदरम्यान ती व्यक्ती आपल्या जागेवरून उठते आणि उकळत्या तेलाच्या कढईजवळ येते.

उकळते तेल लावले तोंडाला

त्यानंतर उकळत्या तेलाच्या कढईत हात घालून ती व्यक्ती समोसे परतते. नंतर एका प्लेटमध्ये कढईतील गरम तेल घेते आणि त्याच गरम तेलाने तो आधी हात धुतो. नंतर आपल्या चेहऱ्यावर ते तेल लावतो. नंतर पुन्हा आपल्या जागेवर बसतो. असे करताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अजिबात चटका बसल्याचे भाव दिसत नव्हते. उलट हसत हसत तो हे सर्व धक्कादायक कृत्य करीत होता.

तुम्ही यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्याबद्दल वाचले असेल; ज्यात लोक उकळत्या तेलात हात घालून जेवण बनवतात. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @love_school नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत तो लाखो लोकांनी पाहिला आहे.

Read More Trending News : मुंबईत तुमच्या रिस्कवर नाश्ता करा; Video तील ‘हे’ किळसवाणे दृश्य पाहून तुम्ही इडली, मेदूवडा खाणं द्याल सोडून

या व्हिडीओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. त्यापैकी बहुतेकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्यात काहींनी मजेशीर कमेंट्स करीत लिहिले की, कितीही पाप केले तरी याला नरकात गेल्यावर तेलात तळले तरी काहीही होणार नाही. त्याच वेळी काहींनी म्हटले की, यमराजांनाही आता उकळत्या तेलात टाकण्याच्या जागी आता आणखी काही पर्यायांचा विचार करावा लागेल.