Scooty Girl Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा असे काही व्हिडीओ असतात जे तुम्हाला पोट धरून हसायला भाग पडतात, तर काही चकित करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर तरुणीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल; कारण यात एक तरुणी सिग्नलवर स्कुटी थांबवण्यासाठी असे काही कृत्य करते की, जे पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की असं कोण करतं भाऊ?

तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की, स्कुटी चालवताना अनेकांचे पाय थेट जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. अशावेळी ट्रॅफिक किंवा सिग्नलवर ब्रेक मारताना त्यांना अवघड जाते. अशावेळी ते आपल्या पद्धतीने स्कुटीवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण, यावेळी ते अशी काही ट्रिक वापरतात की पाहून आपल्याला हसायला येते. या व्हिडीओतही तरुणी असंच काहीसं करताना दिसतेय. तिने सिग्नलवर स्कूटी थांबवण्यासाठी पाय पोहोचत नसल्याने अनोखी पद्धत शोधून काढली. सिग्नलवर स्कुटी थांबवून जमिनीवर पाय टेकवण्याऐवजी तिने असं काहीतरी केलं की पाहून आजूबाजूचे लोक अवाक् झाले. अनेकांनी म्हटलं की, तरुणीची ही कृती पाहून उत्तम रायडर्सदेखील आश्चर्य व्यक्त करतील.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्कुटी चालवणाऱ्या तरुणीची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीत सिग्नलवर ब्रेक दाबून तिला जमिनीवर सहज पाय टेकवून थांबता येत नव्हते, यामुळे सिग्नल लाल दिसताच तिने स्कुटीचा वेग कमी केला आणि ती स्कुटीच्या एका बाजूने आरामात उभी राहिली. यानंतर स्कुटीवरून उडी मारून रस्त्यावर उभी राहिली. .यानंतर सिग्नल ग्रीन होताच ती हँडल पकडून तिने लगेच स्कुटीवर उडी मारली, अ‍ॅक्सिलरेटर दाबून स्कुटी सहज पुढे पळवत नेली.

तरुणीने स्कुटीला ब्रेक मारण्याच्या या अनोख्या स्टाईलचा व्हिडीओ @ itx_kkay नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही लाईक आणि भन्नाट कमेंट्स करत आहेत.. एका युजरने लिहिले की, ‘मित्रा, पापाच्या परीचीही एकदम योग्य पद्धत आहे. ‘ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘भाऊ, तुम्ही काहीही म्हणा, स्कुटी थांबवण्याची ही एक जबरदस्त पद्धत आहे.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘अशा प्रकारे स्कुटी थांबवणे धोकादायक ठरू शकते. ‘ शेवटी एकाने लिहिले की, ‘जर अशाप्रकारे स्कुटी थांबवताना कोणी पडलं तर परिस्थिती आणखी बिकट होईल.’