Birthday Function Viral Video : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि आवडता दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात. यात आपल्या लेकीचा पहिला वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी वडील खूप मेहनत घेत असतात. सजावट, बर्थडे केक अशा अनेक गोष्टींसह वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन केले जाते. मात्र, अशाच एका वाढदिवसाचं सेलिब्रेशन चिमुकलीच्या आईच्या जीवावर बेतलं, या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीत आई-वडील लेकीला घेऊन हॉलमध्ये एंट्री घेत असतात, तितक्यात फायर क्रॅकरने जोरात पेट घेतला अन् पुढे अघटित घडलं.

फायर क्रॅकने अचानक पेट घेतला अन्….

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक लोक जमा झाल्याचे दिसत आहे. तसेच वाढदिवसानिमित्त छान डेकोरेशनही केलं आहे. तिच्या आजूबाजूला छान फुलं अन् धुरांचे डोकेरेशन दिसतेय. यावेळी चिमुकलीचे आई-वडील तिला वाढदिवसानिमित्त सजवलेल्या ट्रॉलीत बसवून हॉलमध्ये छान एंट्री घेत असतात. यावेळी सगळे आनंदाने फायर क्रॅकर पेटवतात. पण, यातील एक फायर क्रॅकर अचानक मोठा पेट घेते अन् त्याची ठिणगी चिमुकलीच्या आईच्या दिशेने उडते, ज्यामुळे चिमुकलीच्या आईच्या चेहऱ्याला दुखापत होते. जे पाहून चिमुकलीसह इतर पाहुणेही घाबरतात, यानंतर एक महिला धावत येत चिमुकलीला उचलून बाजूने नेते.

लग्नसमारंभ आणि वाढदिवसाच्या पार्टीत अनेकदा असे फायर क्रॅकर वापरले जातात. पण, त्यात केमिकल असल्याने अचानक ते मोठा पेट घेतात. अशाने काहीवेळा भीषण घटना घडतात, ज्या काहीवेळा जीवावर बेतू शकतात. अनेकदा निष्काळजीपणामुळेही अशा घटना घडतात. या घटनेतही असाच निष्काळजीपणा दिसून आला.

“हे बेजबाबदार पालक”, युजरच्या कमेंट्स

कारण फायर क्रॅकर चिमुकलीच्या एंट्री गेटच्या अगदी जवळ पेटवण्यात आले, त्यामुळे ते पेटताच त्याची ठिणगी चिमुकलीच्या आईच्या अंगावर उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर अनेकांकडून कमेंट येत आहेत. एकाने लिहिले की, हे बेजबाबदार पालक आहेत. दुसऱ्याने लिहिले की, हे खूप अवघड झाले आहे यार! तिसऱ्या यूजरने लिहिले की, हे लोक आजच्या पिढीचे पालक आहेत. चौथ्या एकाने लिहिले की अशा लोकांच्या आयुष्यात फोटो, व्हिडीओ, रील हे सर्व काही असते. या लोकांनी स्वतःचे बालपण गमावले आहे, ते आपल्या मुलांना कसे वाढवणार?