Pakistani Viral Video: आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस आणखी बिघडली जात आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्यामुळे नागरिकांची चिंता वाढलीय. पाकिस्तानमध्ये अन्न, पेये आणि वाहतुकीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्याने या महागाईने प्रत्येक घराचे बजेट बिघडले आहे. पण, एवढ्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आजकाल अनेक चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे अधिक होत चालली आहेत. सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. चोर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून चोरीच्या संधी शोधून काढतात. तुम्ही चोरीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील अशा एका चोराबद्दलचा व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीही विचारात पडाल.

Basit Ali on BCCI and ICC Over Champions Trophy 2025
“Jay Shah म्हणतील तसंच ते करतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे ICCवर मोठे वक्तव्य; “म्हणाले, BCCI कडे खूप पैसा म्हणून…”
Pakistan Viral Video
Video: कंगाल पाकिस्तानात फिरायला गेली व्यक्ती, हॉटेलची खोली ११७ रुपयांत केली बुक, पण रूम पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही
Will the Indian team go to Pakistan for the Champions Trophy
आयसीसीच्या बोर्डरूममध्ये भारत वि. पाकिस्तान! चँपियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाईल?
Imran Khan's PTI to ban
Imran Khan’s PTI Ban : कधीकाळी सत्तेत असलेल्या पक्षावरच आता बंदी येणार? पाकिस्तानात पीटीआयचं भवितव्य धोक्यात! पण कारण काय?
Pakistan Viral Video
कंगाल पाकिस्तानात मारुतीची अल्टो कार चालविण्याची ही कोणती पद्धत? VIDEO आला समोर, नेटकरी म्हणाले, “अपघात…”
british pm keir starmer marathi news
विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
desi jugaad of Pakistani
भारतातील नव्हे तर आता कंगाल पाकिस्तानातील तरुणांचा भन्नाट जुगाड, Video पाहून म्हणाल, ”असं फक्त पाकिस्तानात होऊ शकतं”
AFG Coach Slams ICC After SA Victory
“स्वतःला अडचणीत आणायचं नाही पण..”, अफगाणिस्तान उपांत्य फेरीतून बाद होताच प्रशिक्षक ICC वर भडकले; म्हणाले, “पीच पूर्णपणे..”

आपण सोने, चांदी किंवा महागड्या वस्तू, मोबाईल फोन, दागिन्यांसाठी दरोडा टाकताना पाहिले असेल, पण पाकिस्तानात भरदिवसा बकऱ्यांची चोरी होण्याची घटना घडली आहे. शेजारच्या देशात आता बकऱ्यांना लुटले जात आहे. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : नजर हटी दुर्घटना घटी! बिबट्याने ‘या’ प्राण्यावर चढवला जोरदार हल्ला, एक चूक अन् खेळ खल्लास; ५ सेकंदात घडलं काय?)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, एक व्यक्ती रस्त्यावरून दोन बकऱ्या घेऊन जात असल्याचे दिसत आहे. थोड्या वेळातच एक कार येते आणि त्या व्यक्तीजवळ थांबते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रस्ताही पूर्ण शांत असतो. चार मुले या कारमधून खाली उतरतात आणि त्या व्यक्तीकडून बकऱ्यांंना हिसकावण्याचा प्रयत्न करतात. चार चोरांपैकी तिघे चोर दोन बकऱ्यांना आपल्या कारमध्ये मागच्या सीटवर टाकतात आणि एक चोर त्या बकरीच्या मालकाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न करीत असतो. यानंतर सर्व चोर कारसह पळून जातात. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये नोंदविली गेली होती, जी आता व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सामायिक करून पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शहा यांनी एक्सवर लिहिले की, पाकिस्तानमधील बकरी ईदच्या आधी रस्त्यावरील गुन्हेगारी वाढत आहे. यापूर्वी मोबाइल फोन आणि मौल्यवान दागिने चोरी झाले होते, आता बकरीला लक्ष्य केले जात आहे. नेटकऱ्यांनीही या व्हायरल व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.