Shraddha Murder Case Shocking Video: दिल्लीमधील श्रद्धा हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. मूळ वसई येथील तरुणी श्रद्धा ही दिल्लीत आपला बॉयफ्रेंड आफताब पूनावालासह लिव्ह इन मध्ये राहत होती. याच आफताबने श्रद्धाचा खून केला, इतकेच नव्हे तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून हा नराधम सहा महिने त्याच घरात राहत होता. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे तो शेजारच्या जंगलात प्राण्यांना खाण्यासाठी टाकत असल्याचेही या तपासात उघड झाले आहे. याच प्रकरणावरुन देशभरात हाहाकार माजला असताना आता या प्रकरणावर अत्यंत धक्कादायक प्रतिक्रिया समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती श्रद्धाचे ३५ काय ३६-३७ तुकडे केले असते असे म्हणताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय सांगतोय हा माणूस?

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना या व्हिडिओतील एक इसम अत्यंत हीन दर्जाची टिपण्णी करताना दिसत आहे. व्हिडिओत त्याने आपले नाव राशिद खान असे सांगितले असून तो मूळचा बुलंदशहर येथील असल्याचे म्हंटले आहे. जेव्हा एखादा माणूस रागात असतो तेव्हा तो ३५ काय ३६-३७ तुकडे करू शकतो. कोणाचा खून करण्यात किंवा तकुणाची हत्या करून त्याचे तुकडे करणे हे काही मोठे काम नाही, चाकू घ्या, आणि कापा.

man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

तर श्रद्धाचे ३६-३७ तुकडे केले असते

हे ही वाचा<< Shraddha Murder Case: ‘हे’ १० मुख्य पुरावे पोलिसांच्या हाती; आफताबने आतापर्यंत काय कबुल केलं? जाणून घ्या

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी बुलंदशहराच्या पोलिसांनी सदर इसमावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे श्रद्धा हत्याकांडावरून सध्या दिल्ली उच्च न्यायालायत एक याचिका दाखल करण्यात आली आहे ज्यानुसार हा पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने मात्र ही याचिका फेटाळून सध्या दिल्ली पोलिस हा तपास सुरु ठेवतील असे सांगितले आहे. आफताब सध्या पोलीस कोठडीत आहे.