scorecardresearch

या लहान बहीण भावाच्या जोडीची नेटकऱ्यांना पडली भुरळ! Viral Video एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये लहान बहीण भाऊ एकमेकांची ओळख करून देत आहेत.

या लहान बहीण भावाच्या जोडीची नेटकऱ्यांना पडली भुरळ! Viral Video एकदा पाहाच
Photo : Social Media

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. कधीकधी यामध्ये काही पोट धरून हसायला लावणाऱ्या गोष्टी असतात तर काही विचार करायला लावणाऱ्या गंभीर गोष्टी असतात. या सर्व पोस्टमधुन मनोरंजन हा मुख्य हेतू असतो. यातील काही पोस्ट तर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान बहीण भाऊ एकमेकांची ओळख करून देत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी दिसत आहेत. ते भाऊ बहीण आहेत अशी ओळख ते या व्हिडीओतून करून देत आहेत. हा व्हिडीओ बनवत असताना त्यांची निरागसता व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओ शूट करत असताना यातील लहान मुलगी “हा माझा भाऊ आहे”, अशी ओळख करून देते, त्यानंतर तिच्या भावाने ओळख करून देणे अपेक्षित असते. पण नेमका त्यावेळी तीचा भाऊ ओळख करून देण्याची ओळ विसरतो, त्यामुळे ही लहान मुलगी हळू आवाजात त्याला काय बोलायचे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. तिच्या मदतीने तो ओळख करून देतो. हा सर्व निरागस प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आणखी वाचा : Iphone 14 लाँच होताच ट्विटरवर झाला मिम्सचा वर्षाव; Viral Memes एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शर्यतीच्या सुरूवातीलाच ती अडखळली पण…; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच

या लहान मुलांच्या निरागसतेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ‘Sheyas’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत १ कोटींहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनीदेखील या बहीण भावाच्या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या निरागसतेचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Siblings adorable video of introducing each other goes viral pns