पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याला कोण ओळखत नाही? आज जरी तो आपल्यात नसला तरी त्याची गाणी आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. सिद्धू मुसेवाला याची गाणी आजही लोक आवडीने ऐकतात. विशेषत: तरुणांमध्ये त्याच्या गाण्याची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. २९ मे २०२२ रोजी सिद्धू मुसेवाला याची गोळी झाडून हत्या करण्यात आली, ज्यानंतर आजही कधी त्याची गाणी वाजली की, चाहते त्याची आठवण काढताना दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अचानक आपण सिद्धू मुसेवालाबद्दल का बोलत आहे? तर यामागचे कारण म्हणजे, सेम टू सेम सिद्धू मुसेवालासारखा दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर युजर्सही मजेशीर कमेंट्स करत आहेत.

सेम टू सेम सिद्धी मुसेवालाची कार्बन कॉपी असणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही काही वेळ गोंधळात पडाल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने पिवळा टी-शर्ट आणि डोक्यावर मरून रंगाची पगडी घातलेली दिसत आहे. पण, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहून सर्वच जण पूर्णपणे आश्चर्यचकित होत आहेत. त्या व्यक्तीचा चेहरा सिद्धू मुसेवालासारखा दिसतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Microsoft Outage Hilarious memes take over X amid global IT glitch
डॉली चायवाला-बिल गेट्सच्या भेटीमुळे ‘Microsoft Down?; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा महापूर
Viral Video Shows food delivery riders kind gesture who stepped in to take care of the Women owner baby
‘अशा लोकांची जगाला…’ बाळाची काळजी घेत रेस्टॉरंट सांभाळणाऱ्या आईला डिलिव्हरी बॉयची मदत; VIRAL VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Mumbai Local
मुंबई लोकलचा पाण्याने पूर्ण बुडालेल्या रुळांवरून धावतानाचा ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का? सोशल मिडियावर होतोय व्हायरल
Saras Baug video
पुणेकरांचे पहिले प्रेम कोणतं? सोशल मीडियावर एकाच नावाचा उल्लेख; VIDEO तुफान व्हायरल
Makeup Tips for perfect gajra hairstyle
Makeup Tips : परफेक्ट गजरा कसा माळायचा? पाहा व्हायरल VIDEO
Palak Pulao Recipe
Palak Pulao Recipe : असा बनवा झटपट होणारा चवदार पालक पुलाव, भन्नाट रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Zomato Delivery boy Stealing Food parcel on door in Bengaluru Caught On Camera
झोमॅटो डिलिव्हरी बॉयनी केली खाद्यपदार्थाची चोरी, दाराबाहेर ठेवलेले पार्सल उचलले, VIDEO होतोय व्हायरल
a girl's hair style goes viral on social media
‘या’ हेअर स्टाइलला तुम्ही कोणते नाव देणार? मुलीच्या हेअर स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा, पाहा VIDEO

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ghantaa नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये सिद्धू मुसेवालाचा लूक पाहून प्रत्येक जण कमेंट करत आहे. एका युजरने लिहिले की, हा सिद्धू दुसऱ्याचा आहे. आणखी एका युजरने लिहिले की, सिद्धू रागावला आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, ५.६ फुटांचा मुसेवाला. चौथ्या युजरने लिहिले की, हा मिशोचा सिद्धू मुसेवाला आहे. पाचव्या युजरने लिहिले की, हे सिद्धू मुसेवालाचे लाइट व्हर्जन आहे.

सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सिद्धू मुसेवालाची गाण्याचे लाखो चाहते आहेत. जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेल्या सिद्धू मुसेवालाची सर्व गाणी हिट झाली आहेत. त्याच्या ‘मेरे ना’ या नव्या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे यूट्यूबवर रिलीज होताच रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले. रिलीजच्या २५ मिनिटांत याला १.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.