VIRAL VIDEO : लग्न सुरू असताना स्टेजवर प्रियकराची एन्ट्री, नवरदेवासमोरच प्रेयसीच्या भांगात सिंदूर भरलं आणि….

नेमकं लग्नातच नवरीचा एक घनचक्कर प्रियकर स्टेजवर पोहोचला आणि नवरीच्या भांगेत जबरदस्तीने सिंदूर भरलं. हे दृश्य पाहून नवरदेवाला धक्काच बसला. ही घटना पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले.

aashiq-ne-bhari-dulhan-ki-maang-viral-video
(Photo:Twitter/ Ram Pravesh Paswan)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे. या व्हिडीओमध्ये एक विवाह सोहळा पार पडत असल्याचं दिसून येतंय. नेमकं लग्नातच नवरीचा एक घनचक्कर प्रियकर स्टेजवर पोहोचला आणि नवरीच्या भांगात जबरदस्तीने सिंदूर भरलं. हे दृश्य पाहून नवरदेवाला धक्काच बसला. ही घटना पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, जो पाहताच व्हायरल झाला.

या व्हिडीओमध्ये सर्व काही इतक्या घाईत घडलेलं आहे की अचानक कोण आलं हे तिथल्या लोकांना सुद्धा समजलं नाही. त्या व्यक्तीने मफलरने आपला चेहरा लपवला होता आणि तो स्टेजवर येताच त्याने नवरीला पकडून जबरदस्तीने तिच्या भांगात सिंदूर भरलं. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हे प्रकरण गोरखपूरच्या हरपूर बुधात पोलीस स्टेशन परिसरातील आहे. लग्नाच्या वेळी जेव्हा नवरी-नवरदेव स्टेजवर जयमालाची विधी करण्यासाठी उभे होते. त्याचवेळी या घनचक्कर प्रियकराने एन्ट्री केली आणि थेट नवरदेवासमोरच त्याच्या नवरीच्या भांगात सिंदूर भरण्याचं धाडस केलं. हा घनचक्कर प्रियकर पुन्हा एकदा त्याच्या हातात आणखी सिंदूर घेऊन तो तिच्या भांगेत भरू लागतो. पण तोपर्यंत समोर कोण आहे, याची कल्पना या नवरीला आली होती आणि मग तिने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा : Wedding Gift : काहीही हं! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला जे गिफ्ट दिलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल, हा VIRAL VIDEO पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मरणाच्या दारात असलेल्या मांजरींना वाचवण्यासाठी वापरला हा ‘देसी जुगाड’; पाहा हा VIRAL VIDEO

त्यानंतर नवरीच्या घरचे त्याच्याजवळ येऊन त्याला धक्का देत बाजुला करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे या सगळ्या घटनाप्रसंगी नवरदेव केवळ पाहातच राहिला. आपण जिच्यासोबत लग्न करणार आहोत, तिच्या भांगात आपल्यासमोर दुसऱ्या कोणीतरी सिंदूर भरलं हे पाहून तो सुद्धा सुन्न झाला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाईकवर स्टंट करत मुलींना इम्प्रेस करायला गेला, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. तरुणीच्या बाजूने तात्काळ पोलिसांत तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व गावातील ज्येष्ठांनी समजावून घेत प्रकरण शांत केले. यानंतर नवरदेवासोबत नवरीला निरोप देण्यात आला. मात्र, नवरीच्या प्रियकराचा हा राडा संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला.

आणखी वाचा : दुबईमध्ये अवतरला ‘अलाद्दिन’! कधी पाण्यावरून तर कधी रस्त्यावरून जादुई चादरीवर बसून फिरतोय; VIRAL VIDEO पाहाच…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरपूर बुधात गावातील एका तरुण या मुलीवर खूप प्रेम करत होता. पण, काही दिवसांसाठी जेव्हा तो गावाबाहेर गेला, त्यानंतर संधी साधून या मुलीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडेच ठरवलं. या मुलीचे लग्न १ डिसेंबरला होतं. हा प्रकार प्रियकराला समजल्यानंतर त्याने २८ नोव्हेंबर रोजी गावी परतून थेट प्रेयसीच्या लग्नात जाऊन त्याने हा राडा घातला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sirfire aashiq ne bhari dulhan ki maang google trending video jilted lover forcibly applies si1ndoor in brides manng during her wedding watch viral video today prp