Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स पाहायला मिळतात पण पारंपारिक डान्सची कुठेही तोड नाही. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक पारंपारिक नृत्ये प्रसिद्ध आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते.सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात.

भावा-बहिणीचं नातं किंवा बहिणी बहिणीचं नातं आपण पाहिले तर कधी मस्ती तर कधी रुसवा.सोशल मीडियावरही या नात्यासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.कधी हे व्हिडिओमध्ये बहीण-भावाची तुफान मस्ती असते तर कधी बहीणीच्या लग्नात रडणारा भावू असतो.मात्र सध्या बहिणींच्या डान्सचा धम्माकेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बहि‍णींची अदा पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तिघींनी खानदेशी गाण्यावर असा अप्रतिम डान्स केला आहे की, तो पाहिल्यानंतर तुमची नजर चुकवल्याशिवाय राहणार नाही. ‘पिरी पिरी नाच पोरी’ या गाण्यावरील दोघांचा हा परफॉर्मन्स अप्रतिम आहे, जो सर्वजण पाहतच राहतात.

प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर बहिणी थिरकल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

बहीणाींचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या चांगलाच व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या pranjalll_17_ या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी लाईक्स दिलेले आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,”एकदम कडक”तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,”खूपच छान”अशा अनेक सर्वांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.