Situations Where Silence Speaks Louder Than Words : कधी-कधी समोरची व्यक्ती काही बोलल्यानंतर आपण विचार न करता लगेच प्रतिक्रिया देतो. त्यामुळे आधीच असलेली परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखी बिघडते. अशावेळी आपलीच घाई किंवा चुकीची प्रतिक्रिया परिस्थिती कठीण बनवते आणि नंतर आपल्यालाच वाटते की, आपण योग्य वागलो की चूक केली?

त्यामुळे कधीकधी घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नसते. पण, आपण परिस्थिती नीट न समजताच प्रतिक्रिया देतो. आचार्य चाणक्यांनीही त्यांच्या नीती ग्रंथात याबद्दल माहिती दिली आहे. चाणक्यांचा असा विश्वास होता की, अविचारी शब्द अनेकदा नातेसंबंधांना नुकसान पोहोचवू शकतात आणि मोठ्या समस्यांनाही कारणीभूत ठरू शकतात.

इतकेच नाही, तर तुमचा कमकुवतपणा देखील सहज उघड होते. अशा परिस्थितीत शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. चला, आम्ही तुम्हाला अशा प्रसंगांबद्दल सांगतो जेव्हा बोलण्याऐवजी शांत राहणे सगळ्यात शहाणपणाचे ठरते.

राग

रागाच्या भरात बोलल्याने अनेकदा कठोर शब्द तोंडून निघतात आणि नंतर पश्चात्तापाशिवाय हाती काहीच राहत नाही. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात की, राग जाईपर्यंत शांत राहिल्याने अनावश्यक भांडण आणि नाती तुटण्यापासूनही रोखता येते.

अपमान

आपल्या हक्कांसाठी बोलणे, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणे योग्य आहे. पण, जर कोणी तुमचा सर्वांसमोर अपमान करत असेल. तर त्या क्षणी लगेच प्रत्युत्तर देण्याऐवजी काही वेळ शांत राहणे आणि परिस्थिती निवळल्यानंतर योग्य पद्धतीने बोलणे अधिक चांगले ठरू शकते. कधीकधी, तुमचे मौन हेच ​​समोरच्या व्यक्तीला दिलेले सर्वोत्तम उत्तर असू शकते.

तुम्हाला दोन्ही बाजू माहिती असतील

जेव्हा तुम्हाला संपूर्ण सत्य माहित नसते. तेव्हा तुम्ही कधीही बोलू नये. पूर्ण माहितीशिवाय बोलणे हानिकारक ठरू शकते. संपूर्ण माहितीशिवाय कोणत्याही विषयावर भाष्य करणे टाळा.

भविष्यातील योजना

असे म्हटले जाते की, तुमच्या योजना इतरांना सांगितल्यास तुमच्या सर्व योजना उद्ध्वस्त होतात. म्हणून तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि रणनीती नेहमी गुप्त ठेवाव्यात आणि त्या पूर्ण होईपर्यंत मौन बाळगावे. तुमच्या योजना खूप लवकर उघड केल्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

दुःख

जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी किंवा खूप निराश असते, तेव्हा तिला आधार देण्यासाठी नेहमी बोलण्याची गरज नसते. अशावेळी तिच्याजवळ शांतपणे राहणे आणि तिचे ऐकून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. तुमची साथ आणि शांतपणे दिलेला आधार त्या व्यक्तीला शब्दांपेक्षा जास्त दिलासा देऊ शकतो. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये लगेच बोलण्याऐवजी शांत राहणेच योग्य ठरते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)