scorecardresearch

मालगाडीला धक्का देण्याची आली वेळ! या रेल्वे स्थानकाचा Video व्हायरल का होतोय? एकदा पाहाच

एरव्ही दुचाकी, चारचाकी वाहनांना धक्का देतानाचा व्हिडीओ पाहिला असले, पण चक्क मालगाडीला धक्का दिल्याचा व्हिडीओ पाहिलात का?

Uttar Pradesh Bareilly Railway Station
मालगाडीला धक्का देतानाचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter)

Railway Station Viral Video : रस्त्यावरून प्रवास करताना अचानक दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होतो. त्यानंतप काही माणसं त्या वाहनांना धक्का देऊन स्टार्ट करतानाही दिसतात. पण उत्तर प्रदेशच्या बरेली रेल्वे स्थानकात काहीसं वेगळं घडलं आहे. कारण रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुचाकी, चारचाकी नव्हे तर थेट रेल्वेच्या मालगाडीलाच धक्का दिल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. रेल्वे मालगाडीचा हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्मवरून मालगाडीला सहा माणसं धक्का देत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. एका बाजूला चार माणसं जोर लावत असून मालगाडीच्या पुढच्या बाजूला इतर दोन जण धक्का देत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण एरव्ही छोट्या मोठ्या गाड्या धक्का देऊन स्टार्ट करताना लोक रस्त्यावर दिसतात. पण रेल्वे स्थानकावर चक्क मालगाडीलाच धक्का दिल्यानं आश्यर्य व्यक्त केलं जात आहे.

नक्की वाचा – मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आधी जेवणावर ताव मारला, बिल भरायची वेळ आली अन्… त्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

मालगाडीचा हा व्हिडीओ रिपोर्टर जी नावाच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘चल मित्रा धक्का मार…उत्तर प्रदेशच्या बरेली रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ.’ रेल्वे गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास रेल्वेच्या तंत्रज्ञान विभागाकडून तातडीनं पाहणी केली जाते. पण बरेली रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांना मालगाडीला धक्का देण्याची वेळ आल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 16:00 IST
ताज्या बातम्या