सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. थोडा जरी पाऊस आला तरी नदी, नाले, तलाव ओसंडून वाहतात. समुद्राच्या किनारी मोठ्या लाटा उसळतात. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषत: समुद्रकिनारी, नदी, ओढा, धबधब्याजवळ जाताना काळजी घेणे गरजेचे आहे पण वारंवार सुचना देऊनही अनेक लोक निष्काळजीपणाने वागतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. लोकांना आपल्या जीवाची किंमतच नसते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील लंगुरिया टेकडी धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् मोठी लाट आली. मोठ्या लाटेमुळे पाण्याच्या प्रवाहात धबधब्याच्या पाण्यामध्ये सहा तरुणी वाहून जाऊ लागल्या पण सुदैवाने त्या मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात वाचल्या. काळ आला होता पण वेळ नाही असे म्हणतात पण याची प्रचिती देणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहत आहे.

रविवारी घडलेल्या या नाट्यमय घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे धबधब्याच्या ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगण्यावर पुन्हा प्रकाश टाकला आहे. जवळजवळ दोन मिनिटांच्या या फुटेजमध्ये तरुणी धबधब्याच्या मध्यभागी खडकांवर अडकल्याचे दिसत आहे. अचान वेगाने वाढणारे पाण्याबरोबर त्या देखील वाहून जाऊ लागल्या. एका तरुणीने प्रथम सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यात यश मिळवले. पण त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर तीन तरुणींना मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागल्या.

सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले आणि तिघींनी काही सुरक्षितपणे बाहेर खेचले. धबधब्याच्या दुसऱ्या बाजूने आणखी एका तरुणीला वाचवण्यात आले, तर काही मिनिटांनंतर उर्वरित तरुणींनाही उपस्थित लोकांनी वाचवले.

या बचाव कार्यादरम्यान, एका तरुणी दगडावर आपटल्याने दुखापत झाली आणि त्यानंतर तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी एनडीटीव्हीला सांगितले.

साक्षीदारांनी सांगितले की, “परिसर शांत होता, हवामान सामान्य असल्याने अनेक लोक धबधब्याचा आनंद घेत होते. पण, टेकडीवरून अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने पर्यटकांना तातडीने परिसर रिकामा करावा लागला.

गावकऱ्यांनी सांगितले की, लंगुरिया धबधब्यावर पहिल्यांदाच इतका जोरदार प्रवाह पाहिला.

व्हिडिओ पाहून नेटकरऱ्यांनी चिंता आणि रोष व्यक्त केला. व्हिडीओवर कमेंट करत एकाने सांगितले की, “मजा मस्तीच्या नादात त्यांना कसलेच भान राहत नाही.”

दुसऱ्याने कमेंट केली की, पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

तिसऱ्याने सांगितले की, विशेषत: पावसाळ्यात अचानक पाण्याची पातळी वाढते त्यामुळे सावधगिरी बाळगा.

संपूर्ण देशात मान्सूनने थैमान घातले आहे, भारतीय हवामान खात्याने बिहारमधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातही विजांसह वादळ आणि सोसाट्याचे वारे (ताशी ३०-४० किमी) येण्याची शक्यता आहे. २ जुलै रोजी राज्यातही अशीच हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३ जुलै रोजी, आयएमडीने बिहारमधील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि सोसाट्याचे वारे (ताशी ३०-४० किमी) येण्याची शक्यता वर्तवली आहे. ४ जुलै रोजी देखील हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.