scorecardresearch

२००० वर्षांपूर्वी मेटल धातूसह झाली होती कवटीची शस्त्रक्रिया, प्रगत वैद्यकशास्त्राचा सर्वात जुना पुरावा सापडला

अलीकडेच २००० वर्षांपूर्वी कवटीच्या ऑपरेशनचा पुरावा सापडला आहे. यामध्ये तत्कालीन डॉक्टरांनी धातूचा वापर करून तुटलेली कवटी जोडली होती.

eleton surgery performed 2000 years
अलीकडेच २००० वर्षांपूर्वी कवटीच्या ऑपरेशनचा पुरावा सापडला आहे. (फोटो: @museum of osteology )

आधुनिक वैद्यकशास्त्राने मानवी शरीराच्या जवळपास प्रत्येक अवयवावर शस्त्रक्रिया करणे शक्य केले आहे. परंतु, काही वर्षांपूर्वी हे करणे फार कठीण होते. प्राचीन काळी जमाती, जाती, राजे आपापल्या सीमा विस्तारासाठी लढत असत. त्यांच्यापैकी अनेकांना युद्धादरम्यान जखमी झाल्यावर उपचार करणे कठीण होत असे. परंतु, अलीकडेच २००० वर्षांपूर्वी कवटीच्या ऑपरेशनचा पुरावा सापडला आहे. यामध्ये तत्कालीन डॉक्टरांनी धातूचा वापर करून तुटलेली कवटी जोडली होती.

अमेरिकेच्या संग्रहालयात ठेवलेली कवटी

ही धातूची कवटी सध्या अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील ऑस्टियोलॉजी संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. असे मानले जाते की २००० वर्षांपूर्वी युद्धादरम्यान या कवटीच्या माणसाला दुखापत झाली होती. युद्धातून जखमी अवस्थेत परतल्यानंतर या योद्धाच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. या ऑपरेशनमुळे योद्धाची कवटी पूर्णपणे बरी झाली.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

कवटीची शस्त्रक्रिया अजूनही खूप कठीण

तुटलेली कवटी ही अत्यंत गंभीर इजा मानली जाते. यामुळे केवळ कायमचे अपंगत्व येत नाही तर वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो. असे मानले जाते की पेरुव्हियन सर्जनला ही शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर त्याने चमत्कारिकरित्या धातू वितळवून तुटलेली कवटी दुरुस्त करण्यासाठी वापरली.

(हे ही वाचा: एलियन होण्यासाठी केल्या १०० हून अधिक शस्त्रक्रिया; केले लाखो रुपये खर्च)

चांदी आणि सोने वापरले?

ऑस्टियोलॉजी संग्रहालयाचा असा विश्वास आहे की तो माणूस शस्त्रक्रियेतून वाचला, परंतु कवटीच्या इतिहासाबद्दल अजूनही अनेक रहस्ये आहेत. संग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्हाला धातू माहित नाही. त्या वेळी या प्रकारच्या प्रक्रियेसाठी पारंपारिकपणे चांदी आणि सोन्याचा वापर केला जात असे. ही कवटी यापूर्वी सार्वजनिकरित्या संग्रहालयात ठेवण्यात आली नव्हती. २०२० मध्ये त्याच्या रहस्यांमुळे, संग्रहालयाने ते प्रदर्शनात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Skeleton surgery performed on metal 2000 years ago the oldest evidence of advanced medicine found ttg

ताज्या बातम्या