Viral Video of Kind Boy : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यात काही आश्चर्यकारक तर काही फार भावनिक असतात. कधी या व्हिडीओंमध्ये प्राणी शिकार करताना दिसतात, पण कधी प्राण्यांप्रती काही लोक खरोखरच माणुसकी दाखवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन जिंकणारा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकला भुकेलेल्या गाईंसाठी असं काही करतोय की पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, कोणी अडचणीत असेल किंवा मदतीची गरज असेल तेव्हा लोक केवळ बघ्याची भूमिका घेतात तर काही फक्त व्हिडीओ काढत बसतात, पण फार कमी लोक असतात जे स्वत:हून मदतीसाठी पुढे सरसावतात, यातून त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडते. व्हायरल होणारा व्हिडीओदेखील त्याचप्रकारचा आहे. यात एक चिमुकला भुकेलेल्या गाईंना खाण्यासाठी मदत करतोय,

माणुसकी असावी तर अशी

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, दोन लहान मुलं झाडाखाली एका चौथऱ्यावर खेळत होती. तेवढ्यात एक लहान गाय तिथे येते आणि फांदीवरील पानं खाण्याचा प्रयत्न करते. पण, गाईची उंची कमी असल्यामुळे तिला पानं खाता येत नाही. हे पाहून एक निरागस मूल गाईला मदत करते, यासाठी तो चौथऱ्यावरून खाली उतरतो आणि फांदीला लटकून ती फांदी खाली वाकवतो.

तो लहान मुलगा फांदीला लटकून ती वाकवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावताना दिसतोय, यामुळे गाय आरामात हिरवी पानं खाऊ शकते. हे पाहून आणखी दोन गाई धावत येतात आणि त्याही पानं खाऊ लागतात.

हा सुंदर व्हिडीओ लोकांच्या हृदयाला स्पर्श करतोय. तो पाहिल्यानंतर लोकही त्यावर सुंदर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने तर या चिमुकल्याला “कलियुगाचा कृष्ण” म्हटले आहे.

हा सुंदर व्हिडीओ @theanomworld नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने लिहिले की, “हा खरा गोरक्षक आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “काही मुले पंख नसलेल्या परींसारखी असतात.” तिसऱ्या एका युजरने लिहिले की, हा खरा “कलियुगाचा कृष्ण” आहे.