Chanakya Niti Women: आचार्य चाणक्य यांनी ‘चाणक्य नीती’मध्ये फक्त राजकारण आणि कूटनीतीच नाही, तर कौटुंबिक जीवन आणि स्त्री-पुरुषांच्या गुणांचंही सविस्तर वर्णन केलं आहे. त्यांनी आपल्या नीतीशास्त्रात एका बुद्धिमान आणि गुणी महिलेचे काही गुण सांगितले आहेत, ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सा भार्या या शुचि दक्षा सा भार्या या पतिव्रता।
सा भार्या या पतिप्रीता सा भार्या सत्यवादिनी॥
चाणक्यांनी एका श्लोकाच्या माध्यमातून एका श्रेष्ठ आणि बुद्धिमान महिलेचे गुण सांगितले आहेत, जे पुढीलप्रमाणे आहेत-
कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही
आचार्य चाणक्य यांनी समजूतदार महिलेचे गुण सांगताना म्हटलं आहे की, जी महिला धर्माच्या मार्गावर चालते आणि आपल्या संस्कारांना महत्त्व देते, ती एक समजूतदार महिला असते. तसेच, जी महिला कठीण काळातही घाबरत नाही आणि विचारपूर्वक परिस्थिती हाताळते, तीही बुद्धिमान महिलांच्या श्रेणीत येते.
चाणक्यांनी सांगितले आहेत ‘हे’ गुण
या श्लोकात आचार्य चाणक्य पुढे सांगतात की, एखाद्या महिलेची गोड आणि खरी वाणी हीच तिची सर्वात मोठी ताकद असते. बुद्धिमान महिला आपल्या बोलण्याने शत्रूंनाही शांत करू शकते. तसेच जी महिला सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितींमध्ये शांत आणि समाधानी राहते, तीही एक समजूतदार महिला असते.
वरदानापेक्षा कमी नसते ‘ही’ महिला
एका गुणी आणि समजूतदार महिलेची ओळख सांगताना चाणक्य म्हणतात की, घरातील संसाधनं आणि पैशांचं योग्य नियोजन करणारी महिला, फाजील खर्च टाळणारी आणि भविष्यासाठी बचत करणारी महिला घरासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे सर्व गुण फक्त महिलांसाठीच नाहीत, तर पुरुषांसाठीही आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप उपयोगी ठरतात.
(टीप- या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
