Gold Smuggling Video: सोन्याचे तस्कर परदेशातून सोने आणण्यासाठी अतिशय विचित्र आणि आश्चर्यकारक पद्धती अवलंबतात. यानंतरही तो कस्टम अधिकाऱ्यांच्या हातून सुटू शकलेला नाही. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्यांनी एका तस्कराला पकडले आहे. त्यांच्याकडून ३० लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. या तस्कराकडून अधिकाऱ्यांना ५०० ग्रॅमहून अधिक सोने मिळाले आहे.

विग आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले होते सोने

अबुधाबी येथून तस्करांनी सोने भारतात आणले. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे तस्कराने हे सोने आपल्या विग आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवले होते. अधिकाऱ्यांनी तस्करांकडून ६३०.४५ ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्याची किंमत ३०.५५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशाच्‍या विगमध्‍ये सोने असल्‍याची माहिती कस्टमच्‍या अधिकार्‍यांना समजल्‍यावर ते आश्‍चर्यचकित झाले. यानंतर अधिकाऱ्यांनी तस्कराला ताब्यात घेतले. वृत्तसंस्था एएनआयने व्हिडीओ शेअर केला आहे.

(हे ही वाचा: KGF Chapter 2: रॉकी भाईची क्रेझ; थेट लग्नपत्रिकेवरच छापला सिनेमाचा डायलॉग!)

(हे ही वाचा: अजगराने अचानक गायीच्या वासरावर केला हल्ला, पाय पकडला आणि…; बघा Viral Video)

IGI विमानतळावर पकडला तस्कर

विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोने जप्त केल्यानंतर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तस्कराला IGI विमानतळाच्या टर्मिनल ३ वर पकडण्यात आले. 30.५५ लाख रुपये किमतीचे ६३०.४५ ग्रॅम सोने त्याने विग आणि गुदाशयात लपवले होते. याआधी आणखी दोन सोन्याचे तस्कर पकडले गेले आहेत. त्याच्याकडे सोन्याची पेस्ट होती.