Snake Attack Mongoose Video Viral :  साप आणि मुंगूस यांच्यातील वैर काही नवीन नाही. जेव्हा हे दोन शत्रू एकमेकांसमोर येतात तेव्हा एकाचा तरी मृत्यू हा निश्चित असतो. या लढाईत नेहमी साप जीव वाचवण्यासाठी आणि मुंगूस जीव घेण्यासाठी लढताना दिसतो.कारण सापाला भले भले प्राणी घाबरतात पण मुंगूसासमोर त्याचं काहीच चालत नाही,मुंगूस धारधार दातांनी सापाला गंभीर जखमी करतो, तो सापापेक्षा चपळ असतो. जो सहसा उड्या मारून सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकतो. त्यामुळे मुंगूस मृत्यूची पर्वा न करता सापाशी भिडतो. सध्या सोशल मीडियावर साप आणि मुंगुसाच्या लढाईचा असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चक्क साप मुंगूसाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय, हे दृश्य पाहून तुम्हाला धडकी भरेल.

व्हिडीओत एका नाल्यात एक भलामोठा साप आणि मुंगूस एकमेकांशी लढताना दिसतायत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप हल्ला करत असताना मुंगूस प्रतिकार करण्याऐवजी चक्क पळून जाताना दिसतोय.

व्हिडीओत पाहू शकता की, एका नाल्यात मुंगूस चालत जात असतो. यावेळी साप मागोमाग येत मुंगूसावर झडप घालतो, साप शेपटीच्या मदतीने मुंगूसाला पकडतो. तो आपल्या शेपटीने अशाप्रकारे मुंगूसाला ब्लॉक करतो की, त्याला सुटण्याची संधीच मिळत नाही. यावेळी मुंगूस घाबरून सापाला नाल्यातून उलटा फरफटत पुढे घेऊन जातो. मुंगूस एक झाडाच्या फांदीच्या मदतीने नाल्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला जमत नाही, मुंगूस खूपवेळा सापाला झटकण्याचा प्रयत्न करत असतो पण साप काही आपला विळखा सोडत नाही.

मुंगूस आणि सापाच्या लढाईचा हा व्हिडीओ @snake_nithesh_gowda__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सनेही वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की,कॅमेऱ्यावाल्याने मदत का केली नाही. तर दुसऱ्याने लिहिले की, साप आणि उंदाराची भांडणं दिसतायत ही, तिसऱ्या एकाने लिहिले की, आज मुंगूसावर गेम पलटी झाला.