Snake Attack Shocking Video : सापाविषयी प्रत्येकाच्या मनात एक भीती असते. अनेकांना नाव ऐकले तरी घाम फुटतो. यात सोशल मीडियावरही सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात काहीवेळा लोक विषारी सापाशी खेळताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चक्क सापाशी जीवघेणा खेळ करताना दिसतोय. जो पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मोठ्या सरपटणाऱ्या सापाचा पाठलाग करताना दिसतोय. यावेळी तो चक्क सापाची शेपटी पकडण्याचा प्रयत्न करतो. शेपटी पकडताच साप विजेच्या वेगाने वळून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण क्षणात साप आपला मार्ग बदलून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण तरुण त्याला वारंवार डिवचत राहतो, यावर साप चवताळतो आणि थेट तरुणाच्या अंगावर फणा काढून उभा राहतो. सुदैवाने साप त्याला दंश करत नाही, हे दृश्य पाहताना फार भयानक वाटते.
तरुण सापाला डिवचतो अन्…
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुण आपला जीव धोक्यात घालून वारंवार सापाला डिवचतो, असे करताना तरुण जमिनीवर कोसळतो ज्यानंतर सापही फणा पसरवून थेट त्याच्या छातीवर चढतो. अखेर घाबरून तो तरुण सापासमोर हात जोडतो. पण जसा साप पुढे जातो तसा तो तरुण पुन्हा त्याची शेपटी पकडतो. यावेळी साप आणखीनच खवळतो आणि थेट त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने झेपावतो.
सापाचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ @nituchowdhury222 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. या व्हिडिओवर कमेंट्सचाही पाऊस पडला आहे. एका युझरने लिहिले, “असं वाटतंय की, हा भाऊ यमराजाबरोबर फिरतो.” दुसऱ्याने गंमतीने म्हटले, “हा साप एक उत्तम अभिनेता निघाला. हे दोघे संगनमत करूनच वागत आहेत असं दिसतंय.” आणखी एका युझरने म्हटले की, “असे स्टंट जीवघेणे ठरु शकतात”.
