Snake attack video viral: या जगात अनेक विषारी प्राणी आहेत. त्यातील काही खूप दुर्मीळ असलेल्या प्राण्यांना आपण कधी पाहिलेलंही नसेल. पण, याच विषारी आणि भयानक प्राण्यांच्या यादीत सापांचाही समावेश आहे. साप म्हटलं की, नेहमीच अनेकांच्या अंगावर काटा येतो. साप पाहिला की प्रत्येक जण घाबरतो. या जगात सापाच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्यांच्या दंशामुळे काही मिनिटांत व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. या जगात असे अनेक लोक असतात, ज्यांना खतरनाक कामं करण्यात मजा येते. अनेकदा डेरिंगच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकतात. काही लोकांना यात यश मिळतं; तर काही लोकांसोबत हे करत असताना दुर्घटना होते. काही लोकांना प्राण्यांसोबत खेळणं, मस्ती करणं आवडतं. काही लोक प्राण्यांबाबत इतकेच क्रेझी असतात की, ते त्यांना नेहमी आपल्यासोबत ठेवतात.

सापाचं नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. मग अशात फणा काढलेल्या सापाला किस करणं म्हणजे तर दूरचीच गोष्ट. पण असं जीवघेणं धाडस एका व्यक्तीनं केलं आणि ते त्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Pooja Khedkar First Reaction
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या…
young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
IAS Pooja Khedkar Wealth Pooja Khedkar property 17 crore
IAS Pooja Khedkar Property : पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, सोन्याचे घड्याळ
girl weird dancing on mumbai local railway platform video viral
“ही मुंबईचं नाव खराब करतेय”, रेल्वेस्थानकावरील तरुणीचा विचित्र डान्स VIDEO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “वेडेपणा…”
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
pooja khedkar ias mother manorama khedkar viral video
आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल!

अनेक लोक बिनधास्त सापांशी पंगा घेतात; परंतु काही वेळा त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. दरम्यान, एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती सापाला पकडून डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यानंतर संतापलेल्या सापानं त्याला असा धडा शिकवला की, तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सापाला पकडून डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याच्या या कृतीमुळे साप चांगलाच संतापला. जेव्हा साप वैतागून व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती व्यक्ती तोंड पाठी करते आणि पुन्हा सापाची छेड काढू लागते. हे सुरू असताना पुढच्याच क्षणी साप त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याच्या ओठाला दंश करतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नाशिक स्टेशनवर विदर्भ एक्सप्रेस आली मात्र थांबण्याआधीच महिलेला घाई नडली; थरारक अपघाताचा VIDEO समोर

इन्स्टाग्रामवर @therealtarzann नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तो वारंवार पाहिला जात आहे आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करीत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “एखाद्याला जितका त्रास सहन करता येईल तितका त्रास द्या. ती व्यक्ती यासाठी पात्र आहे.” तर दुसऱ्यानं लिहिलं आहे, “द लास्ट किस ऑफ डेथ.